मान्सूनपूर्व कामांचा आयुक्तांकडून आढावा

By Admin | Updated: May 16, 2014 02:37 IST2014-05-16T02:37:14+5:302014-05-16T02:37:14+5:30

महापालिकेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत पदपथ व रस्त्यांची दुरूस्ती, नाले व गटारांच्या सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत.

Review by Monsoon Commissioner | मान्सूनपूर्व कामांचा आयुक्तांकडून आढावा

मान्सूनपूर्व कामांचा आयुक्तांकडून आढावा

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत पदपथ व रस्त्यांची दुरूस्ती, नाले व गटारांच्या सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे योग्य रीतीने व्हावीत या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त ए.एल.जºहाड हे स्वत: या कामांची पाहणी करीत आहेत. आज त्यांनी वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे व घणसोली या भागात दौरा करून मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. या दौर्‍यात त्यांनी नाले आणि गटारांची व्यवस्थित सफाई झाली आहे की, नाही याची पाहणी केली. तसेच रस्ते आणि पदपथांच्या कामांचा आढावा घेतला. वाशी विभाग पामबीच मार्गाला समांतर जाणार्‍या अरेंजा कॉर्नर येथील मोठ्या नाल्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. आयुक्त जºहाड यांनी आज सकाळी या कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. गटारातून काढलेल्या गाळात मोठ्याप्रमाणात बाटल्या व टाकाऊ वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या आदी वस्तू आढळून आल्या आहेत. या वस्तूंमुळे नाले आणि गटारांतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी नाल्यांत अशा वस्तू टाकू नयेत, असे आवाहन आयुक्त जºहाड यांनी यावेळी केले. या पाहणीदरम्यान नाले आणि गटारांच्या साफसफाईची कामे करणार्‍या कर्मचार्‍यांना हातमोजे, गमबूट आणि इतर सुरक्षाविषयक साहित्य पुरविण्यात आले आहेत की नाही, याचीही आयुक्तांनी कामगारांकडे चौकशी केली. पावसाळ्यात कुठेही पाणी साचून राहू नये, या दृष्टीने विशेष खबरदारी म्हणून ३१ मेपूर्वी ही कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही जºहाड यांनी दिली. यावेळी शहर अभियंता मोहन डगांवकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ उपायुक्त सुभाष इंगळे, सुरेश पाटील, कार्यकारी अभियंता संजय देसाई व विभाग अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Review by Monsoon Commissioner