Join us

महासंचालकांकडून सागरी सुरक्षेचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 23:18 IST

तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांनी पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेतला

मुंबई : तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांनी रविवारी पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. समुद्रातील तेलगळती, जहाजांना अपघात, गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबईसह तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाच्या तयारीची सिंग यांनी माहिती घेतली.पश्चिम किनारपट्टीची सागरी सुरक्षा व्यवस्था, आणीबाणीच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांची सुसज्जता आदी बाबींच्या पाहणीसाठी ते दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय वाढविण्यावरही ते भर देतील.बैठकीत तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाच्या अधिकाºयांनी सर्व माहितीसह गणेश विसर्जनासाठी विसर्जन स्थळांजवळ हेलिकॉप्टर, हॉवरक्राफ्टस् आदी सज्ज ठेवल्याचे सांगितले. सागरी सुरक्षा भेदण्याचे देशविरोधी शक्तींचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही सिंग यांनी यावेळी केले.

टॅग्स :मुंबई