बदलापुरात बोगस मतदारांचा सुळसुळाट : शिवसेनेची तक्रार

By Admin | Updated: April 19, 2015 23:28 IST2015-04-19T23:28:28+5:302015-04-19T23:28:28+5:30

या नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९, बेलवली, स्वप्ननगरी या प्रभागात ११७ मतदार बोगस असल्याची तक्रार शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने केली आहे.

Revenge of bogus voters: Shivsena's complaint | बदलापुरात बोगस मतदारांचा सुळसुळाट : शिवसेनेची तक्रार

बदलापुरात बोगस मतदारांचा सुळसुळाट : शिवसेनेची तक्रार

बदलापूर : या नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९, बेलवली, स्वप्ननगरी या प्रभागात ११७ मतदार बोगस असल्याची तक्रार शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादीचे आशीष दामले आणि शिवसेना पुरस्कृत प्रभाकर पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. मात्र, पाटील यांनी मतदारयाद्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. या तक्रारीत मतदारयाद्यांमध्ये ११७ अशी नावे आहेत की, जी प्रभागातच नव्हे तर बदलापूर शहरातच नाहीत. या नावांची यादी पुरावादाखल सादर करून या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याची संधी न देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. पाटील यांनी या बोगस नावांसंदर्भात प्रतिस्पर्धी उमेदवारावर आरोप केला आहे. याच उमेदवाराने याद्यांमध्ये नावे घुसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक मतदारांची नावे खोटी असून त्यांचे मतदार ओळखपत्रही तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मतदानाच्या दिवशी हे बोगस मतदार मतदानासाठी आल्यास त्यांच्यावर आमचे कार्यकर्ते योग्य ती कार्यवाही करतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यासंदर्भात आशीष दामले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बोगस मतदारांची तक्रार आपणही केलेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Revenge of bogus voters: Shivsena's complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.