ट्रेनमध्ये सापडलेले दीड लाख रुपये दिले परत
By Admin | Updated: September 19, 2014 09:28 IST2014-09-19T02:59:57+5:302014-09-19T09:28:50+5:30
दीड लाखाची रोख रक्कम भरलेली बॅग ट्रेनमध्ये विसरणो म्हणजे ती गमावूनच बसणो! परत मिळण्याची काही शक्यताच नाही.

ट्रेनमध्ये सापडलेले दीड लाख रुपये दिले परत
नवी मुंबई : दीड लाखाची रोख रक्कम भरलेली बॅग ट्रेनमध्ये विसरणो म्हणजे ती गमावूनच बसणो! परत मिळण्याची काही शक्यताच नाही. पण ही अशक्य गोष्ट पनवेलमध्ये घडली. प्रवीणकुमार हे वडिलांवरील उपचारासाठी नेलेले पैसे ट्रेनमध्येच विसरले होते. पण ‘लोकमत’चे कर्मचारी प्रकाश वायदंडे यांना ते सापडताच त्यांनी ते प्रवीणकुमार यांच्या स्वाधीन केले.
प्रकाश वायदंडे हे ऑफिसचे काम संपवून घरी चालले होते. नेहमीप्रमाणो त्यांनी सानपाडा येथून रात्री नऊची पनवेल ट्रेन पकडली. ट्रेन गर्दीने भरून गेली होती. प्रवासी चढत-उतरत होते, पण एक बॅग बराच वेळ रॅकवरच पडून होती. पनवेल जवळ आले तरी बॅगचा मालक काही दिसेना. सगळे प्रवासी उतरले पण बॅग तिथेच. प्रकाश यांनी तिच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ती घेण्यासाठी पुढे येईना. अखेर त्यांनी घाबरतच ती बॅग उघडली. आत पैसे होते. ही ‘अनामत’ ज्याची त्याला लवकरात लवकर परत मिळावी, म्हणून प्रकाश यांनी बॅग घेऊन पनवेल स्टेशन मास्तरचे कार्यालय गाठले. ती बॅग तिच्या मालकार्पयत पोहोचविण्याची विनंती केली. त्यात तब्बल दीड लाखाची रोख रक्कम होती. दुसरीकडे बॅग हरवल्यामुळे प्रवीणकुमार चिंताक्रांत झाले होते. त्यांच्या वडिलांच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी मित्रकडून पैसे उधार घेतले होते. ते घेऊन ते कामोठे येथील रुग्णालयात चालले होते, पण उपचारांच्या विचारात बॅग ट्रेनमध्येच राहिली होती. स्टेशनमास्तरने बॅग तपासली असता, त्यात काही कागदपत्रे आढळली. त्यावरून त्यांनी प्रवीणकुमार यांच्याशी संपर्क साधला. ती बॅग त्यांचीच असल्याची खात्री पटल्यानंतर स्टेशनमास्तरने ती बॅग त्यांच्या स्वाधीन केली. (प्रतिनिधी)
दिलेले पैसे नाकारले
प्रकाश वायदंडे यांच्या प्रामाणिकपणामुळे भारावून जाऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवीणकुमार यांनी त्यांना 10 हजार रुपये देऊ केले, मात्र ‘पैसे नको.. कधी मी संकटात सापडलो, तर मदत करा,’ असे सांगून त्यांनी ते नम्रपणो नाकारले. वायदंडे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आणि माणुसकीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.