परतीच्या पावसाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:30 AM2019-09-21T06:30:43+5:302019-09-21T06:30:47+5:30

हवामान खात्याकडून आलेला अतिवृष्टीचा इशारा खोटा ठरला असला, तरी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली.

Return rain | परतीच्या पावसाचा दणका

परतीच्या पावसाचा दणका

Next

मुंबई : हवामान खात्याकडून आलेला अतिवृष्टीचा इशारा खोटा ठरला असला, तरी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईत सकाळीच सुरू झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांची गैरसोय झाली. काही सखल भागांत पाणीही तुंबू लागले होते. तर मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे विलंबाने आणि रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला.
गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र पावसाने तुरळक हजेरी लावली होती. परंतु, शुक्रवार पहाटेपासून मुंबई शहर व उपनगराला पावसाने झोडपून काढले. अधूनमधून जोरदार बरसणाºया पावसाने सकाळी कार्यालय गाठण्याच्या धावपळीत असलेल्या चाकरमान्यांची कोंडी केली.
दक्षिण मुंबईसह सायन, माटुंगा, घाटकोपर, कुर्ला आदी भागांमध्ये पाणी तुंबू लागल्याने बेस्ट उपक्रमाने आपल्या बस मार्गात बदल केले. तर मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिट उशिराने सुरू होती. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईतील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
>येथे तुंबले पाणी
गांधी मार्केट, सायन रोड नंबर २४, प्रतीक्षानगर समाजमंदिर हॉल, कुर्ला एलबीएस रोड, घाटकोपर श्रेयस सिनेमाजवळ आदी भागांत पाणी साचल्याने १६ बस मार्गांत बदल करण्यात आले.
हार्बर मार्गावरील कुर्ला-चेंबूर स्थानकाजवळ रुळावर पाणी भरल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत होती.
>धरणांत जमा पाणीसाठा (दशलक्ष लीटर)
२०१९ - १४ लाख १६ हजार १७७ दशलक्ष लीटर
२०१८ - १३ लाख ६४ हजार ३६८ दशलक्ष लीटर
२०१७ - १४ लाख २८ हजार ७५५ दशलक्ष लीटर

Web Title: Return rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.