परतीच्या पावसाचा फटका

By Admin | Updated: October 4, 2014 22:42 IST2014-10-04T22:42:49+5:302014-10-04T22:42:49+5:30

रोहा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री निसर्गाचा प्रकोप जाणवला. अचानक बरसलेल्या परतीच्या पावसाने परिसरात मोठी हानी केली.

Return to back | परतीच्या पावसाचा फटका

परतीच्या पावसाचा फटका

>रोहा : रोहा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री निसर्गाचा प्रकोप जाणवला. अचानक बरसलेल्या परतीच्या पावसाने परिसरात मोठी हानी केली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मोठमोठय़ा गारा पडल्या. यात 13 जण जखमी झाले. अनेक घरांची छपरे, कौले उडाली, खिडक्यांच्या काचा फुटल्या, अन्नधान्य भिजले. यात 35क् हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या या रौद्ररूपामुळे भयभीत होऊन नागरिकांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने 1क् ते 12 तास वीजपुरवठा खंडित होता. 
शुक्रवारी रात्री विजयादशमीच्या सणाची आणि नवरात्रौत्सवाची लगबग सुरू असताना अचानक आलेल्या परतीच्या पावसाने प्रकोप केला. धाटाव पंचक्रोशीतील उडदवनेपासून निवीर्पयत सर्वच गावांना याचा फटका बसला. एकटय़ा उडदवणो गावातच 13क् हून अधिक घरांची वाताहात झाली. वादळी वा:याने घरांवरती छत आणि छपरासोबत लोखंडी सळ्या आणि वजनी पाइपही उडून गेले.
वादळासोबत टपो:या गारा पडल्याने उडदवने गावातील घरांच्या छतांना मोठी छिद्रे पडली. गारा पडताना होणारा आवाज पाहून कुणीतरी घरावर दगड मारत असल्याचा भास रहिवाशांना झाला. तालुक्यात 35क्हून अधिक घरांची हानी झाल्याने भयभीत होऊन नागरिकांनी रात्र जागून काढली. यामध्ये उडदवने येथील जर्नादन गायकर, दुर्गाबाई गायकर, वसंत कराळे, कृपावंत गायकर, कुमारी लहाणो आदी 13 जण जखमी झाले आहेत.
ठिकठिकाणी रस्त्यावर महाकाय वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या गावांत चालत जाण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. पालदाडच्या पुलालगत असलेली सचिन परब यांच्या राइस मिलची पूर्णपणो वाताहत झाली. येथील विठ्ठल भोई, मंगेश गायकर, चंद्राबाई जनार्दन गायकर आदींच्या 2क् घरांची तसेच निवी येथील विनायक पाटील यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील काही गृहसंकुलांच्या छताचे पत्रे उडून गेले.
रोहा तालुक्यात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाही शनिवारी  सकाळी 11 वाजेर्पयत कोणीही जबाबदार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी नुकसानग्रस्त गावांस भेटी दिल्या नाहीत. तर रोह्याच्या तहसीलदारांनीही या गावांची धावती पाहणीही केली नव्हती. 
या वादळाने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने अवघी रात्र तालुक्यात वीजपुरवठा खंडित होता. रात्रभर शर्थीचे प्रय} करून 12 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास महावितरणचे कार्यकारी अभियंता के. बी. गोरडे आणि त्यांच्या कर्मचा:यांना यश आले.
(वार्ताहर)
 
नुकसानग्रस्त गावांची पाहणी व पंचनामे करून अहवाल देण्याच्या सूचना मी सर्व तलाठय़ांना दिलेल्या आहेत. दुपारपासून हे कामही सुरू झालेले आहे. मी स्वत: यात जातीने लक्ष घालत आहे. शंभर टक्के पंचनामे केले जातील. या कार्यवाहीपासून कोणीही उपेक्षित राहणार नाही याची दखल घेतली जाईल.
- सुभाष भागडे, प्रांत तथा उपविभागीय अधिकारी, रोहा.

Web Title: Return to back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.