एसटी चालकपदाचा निकाल पुढील आठवड्यात
By Admin | Updated: May 29, 2015 01:14 IST2015-05-29T01:14:29+5:302015-05-29T01:14:29+5:30
एसटी महामंडळाकडून कनिष्ठ चालक पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी एसटी महामंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात आली.
एसटी चालकपदाचा निकाल पुढील आठवड्यात
मुंबई : एसटी महामंडळाकडून कनिष्ठ चालक पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी एसटी महामंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल पुढील अठवड्यात लागणार असून पात्र उमेदवारांना एसएमएसव्दारे त्याची माहिती देण्यात येणार आहे.
एसटी महामंडळात ७ हजार ७६९ कनिष्ठ चालक पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडे ३३ हजार ५00 अर्ज आले. या पदासाठी एसटी महामंडळाकडून ३ मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. २८ हजार 0५६ उमेदवारच या परीक्षेला बसले. संपूर्ण निकाल एसटीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल. निकालनंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि एसटीच्या पुण्यातील भोसरी येथील ट्रॅकवर वाहन चालन चाचणी घेण्यात येईल. कनिष्ठ चालक प्रत्यक्षात सेवेत येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
एसटी महामंडळातर्फे १ जून रोजी परिवहन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस अहमदनगर-पुणे मार्गावर धावली होती. त्याची आठवण म्हणून महामंडळाचा वर्धापन दिन साजरा होत होता. मात्र गेल्या वर्षापासून हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा जातो. परिवहन दिन साजरा करताना यात सर्व बसेस आणि स्थानके स्वच्छ करतानाच प्रवाशांशी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेतल्या जातात.