आॅक्टोबर हीटचा प्रचारावरही परिणाम
By Admin | Updated: October 7, 2014 01:28 IST2014-10-07T01:28:28+5:302014-10-07T01:28:28+5:30
आधीच निवडणुकीसाठी कमी कालावधी मिळाल्याने राजकीय मंडळी हैराण आहेत.

आॅक्टोबर हीटचा प्रचारावरही परिणाम
अनसिंग (वाशिम): वाशिम तालुक्यातील जवळा येथील ४८ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची घटना जवळा शेतशिवारात सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे जलदग तीने फिरविली आहे.
जवळा येथील हरिभाऊ बळीराम नागरे हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिसरात परिचित होते. ६ ऑ क्टोबर रोजी जवळा ते अनसिंग रस्त्यावरील जवळा शेतशिवारात अग्रवाल यांच्या शेताजवळ हरिभाऊ नागरे हे रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे दुपारच्या सुमारास आढळून आले. मृतकाच्या डोळय़ात चटणी टाकून, डोक्यावर विळय़ाने घाव घातल्याच्या तसेच दगडाने ठेचून हत्या केल्याच्या निष्कर्षापर्यंंत पोलिस पोहोचले आहेत.
मृतकाचा भाऊ मारोती बळीराम नागरे यांनी याबाबत अनसिंग पोलिस स्टेशनला माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. या घटनेचा उलगडा करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते; मात्र घटनेच्या मुळापर्यंंत जाण्यात श्वानपथकाला यश आले नाही. याप्रकरणी मारोती नागरे यांच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार चंद्रशेखर कदम करीत आहेत.