Join us  

महामुंबईतील दोन हजार ठिकाणी राहणार निर्बंध; कंटेनमेंट झोनचे निकष यापुढे ठरणार महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:55 AM

लवकर शिथिलता मिंळण्याची शक्यता कमी : मुंबई महापालिकेकडून ३ हजार ३३७ इमारती सील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येत असला, तरी सध्याच्या स्थितीत महामुंबई परिसरात साधारणत: दोज हजारांवर ठिकाणे कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे तेथील निर्बंध लवकर उठण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, हे झोन उठवण्याच्या, त्यात बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे झोन ठरण्याचे नियम शिथील करावेत, अशी मागणीही सुरू झाली आहे.

मुंबई ७१७, ठाणे २३९, कल्याण-डोंबिवली १६८, नवी मुंबई १११, मीरा-भार्इंदर १४२, वसई-विरार १८६ ही महापालिका क्षेत्रे आणि पालघर ३८, रायगड ११७ हे दोन जिल्हे तसेच भिवंडी, उल्हासनगर महापालिका मिळून या महामुंबई क्षेत्रात जवळपास दोन हजार कंटेन्मेंट झोन आहेत.मुंबई शहर व उपनगरात मुंबई महापालिकेने कंटेन्मेंट झोनमधील ३ हजार ३३७ इमारती सील केल्या आहेत. यातील घरांची संख्या एक लाख ३०,४९३ आहे. सील केलेल्या परिसरातील एकूण लोकसंख्या ६ लाख २८ हजार ३७७ आहे. तर येथील कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार ६६२ आहे.कुर्ला : सर्वाधिक कंटेनमेंट झोनमुंबईतील ७१७ कंटेनमेंट झोनमधील घरांची एकूण संख्या ९ लाख ४७ हजार २४६ आहे. तर येथील एकूण लोकसंख्या ४२ लाख २६ हजार १७९ एवढी असून एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ४८४ आहे.एल विभागात कुर्ला येथे ११४ एवढे म्हणजे सर्वाधिक कंटेनमेंट झोन आहेत. आर/नॉर्थमध्ये ६०, आर/साउथमध्ये ४०, एसमध्ये ६६, एम/ईस्टमध्ये ६६ कंटेनमेंट झोन आहेत.मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सील केलेल्या इमारतींची संख्या अधिक आहे. के/डब्ल्यू विभागात ३००, आर/सी विभागात २३४, एफ/नॉर्थ विभागात २१५ तर एल विभागात २०२ इमारती सील केल्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस