खोळंबलेला जोडरस्ता मार्गी लागला
By Admin | Updated: July 3, 2015 22:23 IST2015-07-03T22:23:27+5:302015-07-03T22:23:27+5:30
बोईसर ते तारापुर व नवापुर नाका ते एमआयडीसी या दोन मुख्य व महत्वाच्या रस्त्यांना जोडणारा बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर या मोठ्या गृह व व्यापारी संकुलातून

खोळंबलेला जोडरस्ता मार्गी लागला
बोईसर : बोईसर ते तारापुर व नवापुर नाका ते एमआयडीसी या दोन मुख्य व महत्वाच्या रस्त्यांना जोडणारा बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर या मोठ्या गृह व व्यापारी संकुलातून जाणाऱ्या दोन जोड रस्त्यापैकी एका रस्त्याचे काम बोईसर ग्रामपंचायतीने मार्च महिन्यात केले परंतु निधी व नियोजना अभावी त्याला लागुनच असलेल्या जोड रस्त्याचे काम खोळंबून ठप्प झाले होते. अखेर आदिवासी विकास निधीतून बेचाळीस लाख रू. खर्च करून खोळंबलेला रस्ता पालकमंत्री विष्णु सवरा यांनी मार्गी लावुन त्यांच्याच हस्ते या रस्त्याचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले.
खोळंबलेला रस्ता मार्गी लागण्याकरीता पालघर जिल्हापरिषदेचे कृषी सभापती अशोक वडे यांच्या माध्यमातुन ओस्तवाल एम्पायर फेडरेशनचे अध्यक्ष नागेश राऊळ, उपाध्यक्ष वैभव संखे, पदाधिकारी अनंत दळवी, राजु संखे, राजेश अधिकारी, राजू राठोड इ. सह ओस्तवाल मधील रहिवाशी व बोईसरच्या नागरीकांनी पालकमंत्री विष्णु सवरा यांना निवेदन देऊन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. अखेर पालकमंत्री सवरा यांनी आदिवासी विकास निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करून खोळंबलेला रस्ता मार्गी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यासंदर्भात लोकमतमध्ये १ एप्रिल २०१५ रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. (वार्ताहर)