कोरोना कालावधीत आजारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सेवाकाल ग्राह्यधरणार महासभेत मंजुर झाला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 02:14 PM2020-09-09T14:14:09+5:302020-09-09T14:16:08+5:30

कोरोनाच्या महामारीत काम करणाºया महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठोक पगारावरील, कंत्राटी कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या या काळातील पगार कापला जाणार होता, तसेच त्यांचा सेवाकालही ग्राह्य धरला जाणार नव्हता. परंतु आता या काळातील त्यांचा सेवाकाळ ग्राह्य धरला जाणार आहे. त्या संदर्भातील ठराव मंगळवारी झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे.

A resolution was passed in the General Assembly to consider the service period of sick employees and officers during the Corona period | कोरोना कालावधीत आजारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सेवाकाल ग्राह्यधरणार महासभेत मंजुर झाला ठराव

कोरोना कालावधीत आजारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सेवाकाल ग्राह्यधरणार महासभेत मंजुर झाला ठराव

Next

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करतांना महापालिकेच्या सेवेतील कोरोना प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी उपाय योजना केल्या जात असतांना महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम घेऊन काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर कायम सेवेतील, कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु अशा कर्मचाºयांचा पगार कापण्यात येऊ नये, त्यांची गैरहजेरी लावली जाऊ नये अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या महासभेत नजीब मुल्ला यांनी या संदर्भात ठराव मांडला आणि गटनेते दिलीप बारटक्के यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता या काळातील कर्मचारी, अधिकाºयांचा सेवाकाल ग्राह्य धरला जाणार आहे.
              कोरोनाचे संकट ओढावल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अधिकारी व कर्मचारी हे लॉकडाऊन कालावधीत सुध्दा सेवा बजावत होते. कोरोना विरोधातील ही लढाई संपूर्ण सक्षमतेने लढली जात असतांना काही ठा.म.पा. अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने काही रु ग्णांना रु ग्णालयात तसेच काही रु ग्णांना महानगरपालिकेने दाखल केलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही रु ग्णांना घरीच विलगीकरण करु न राहणेसाठी सुचित करण्यात आले आहे. अशा प्रकारे कोरोनाचा संसर्ग होऊन कोरोनाबाधित झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील तसेच कंत्राटी/ठोक मानधनावरील अधिकारी व कर्मचारी यांचा या कालावधीतील अनुपस्थिती ही गैरहजेरी न धरता कर्तव्य कालावधी म्हणून मानण्यात यावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज घेण्यात येऊ नये व त्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करता त्यांना संपूर्ण वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी मागील आठवड्यात महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या महासभेत त्याच अनुषंगाने नगरसेवक नजीब मुल्ला यांनी देखील या कर्मचारी, अधिकाºयांची या काळातील सेवा ग्राह्य धरुन त्यांना पूर्ण पगार द्यावा अशा आशयाचा ठराव मांडला, त्याला शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी अनुमोदन दिले.
 

Web Title: A resolution was passed in the General Assembly to consider the service period of sick employees and officers during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.