जुन्या लोकलमुळे प्रवासी त्रस्त

By Admin | Updated: November 10, 2014 22:21 IST2014-11-10T22:21:55+5:302014-11-10T22:21:55+5:30

ठाणो - वाशी मार्गावर गेल्या काही दिवसांपासून 12 ऐवजी 9 डब्यांच्या लोकल धावत असल्याने प्रवाशांना गाडी पकडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Residents suffer because of the old locality | जुन्या लोकलमुळे प्रवासी त्रस्त

जुन्या लोकलमुळे प्रवासी त्रस्त

नवी मुंबई : ठाणो - वाशी मार्गावर  गेल्या काही दिवसांपासून  12 ऐवजी 9 डब्यांच्या लोकल धावत असल्याने प्रवाशांना गाडी पकडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेचे डबे काढण्यात आल्याने 9 डब्यांच्या जुन्या आणि कोंदट लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढवली आहे.
 नोकरी व व्यवसायानिमित्त ठाणो आणि मुंबईतून ट्रान्सहार्बर मार्गे नवी मुंबईत  येणारा कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. रेल्वे प्रवाशांचा हा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या मार्गावर 12 डब्यांच्या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्याकरिता फलाटांची लांबी देखील वाढवण्यात आली. 
तरीही प्रशासनाकडून एकूण 1क् लोकलपैकी 3 लोकल 9 डब्यांच्या चालवल्या जात आहेत. परंतु रेल्वेच्या फे:या वाढवून उर्वरित लोकल देखील 12 डब्यांच्या कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे. 
एकीकडे अपु:या रेल्वे फे:यांमुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. अशातच गेल्या दहा दिवसांपासून 12 डब्यांच्या काही लोकल ऐवजी 9 डब्याच्या लोकल धावत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रस हा महिला प्रवाशांना होत आहे.  
ठाणो-वाशी रेल्वेमार्गावर शेवटचा डबा हा महिला राखीव असल्याने महिला प्रवासी 12 डब्यांप्रमाणो फलाटावर निश्चित ठिकाणी उभ्या असतात. मात्र समोर 9 डब्यांची रेल्वे येताच त्यांना धावत पुढे जावून रेल्वे पकडावी लागत आहे. असाच त्रस साधारण डब्यातून प्रवास करणा:या प्रवाशांनाही समोर प्रथम श्रेणीचा डबा आल्याने होत आहे. या मार्गावरील गेल्या दहा दिवसांपासून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणो-वाशी रेल्वेमार्गावरील रेल्वेचे काही डबे देखभाल दुरुस्तीसाठी काढण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल 9 डब्यांच्या धावत आहेत. दुरुस्तीनंतर लवकरच हे डबे रेल्वेला जोडून 12 डब्यांच्या लोकल पूर्ववत केल्या जातील असे  रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्नवी मुंबईतील बहुतांश स्थानकांमधील उद्घोषणा बंद असल्याने 12 ऐवजी 9 डब्यांची रेल्वे धावत असल्याची होणारी सूचनाही प्रवाशांर्पयत पोहोचत नाही. त्यामुळे प्रवाशांची फलाटवर आलेली लोकल पकडताना तारांबळ होते. लोकल कमी डब्यांची असल्यास प्रशासनाने किमान स्थानकांवर स्पष्टपणो पूर्वसूचना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 

 

Web Title: Residents suffer because of the old locality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.