रहिवाशांनी भरले ३ कोटी ८४ लाखांचे थकीत भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:55+5:302021-03-04T04:07:55+5:30

अभय योजनेला प्रतिसाद; ‘म्हाडा’च्या संक्रमण शिबिरातील वसुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘म्हाडा’च्या २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील ...

Residents paid arrears of Rs 3 crore 84 lakh | रहिवाशांनी भरले ३ कोटी ८४ लाखांचे थकीत भाडे

रहिवाशांनी भरले ३ कोटी ८४ लाखांचे थकीत भाडे

Next

अभय योजनेला प्रतिसाद; ‘म्हाडा’च्या संक्रमण शिबिरातील वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘म्हाडा’च्या २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरूंसाठीच्या अभय योजनेला प्रतिसाद मिळत असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत २८ फेब्रुवारीपर्यंत ३ कोटी ८४ लाख ७९ हजार ४०४ रुपये थकीत भाडे रहिवाशांनी भरले.

पहिल्या टप्प्यांतर्गत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरणाऱ्या संक्रमण शिबिर गाळ्यांतील रहिवाशांना एकूण व्याजात ६० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरूंनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजात ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल.

थकीत रक्कम भरणाऱ्यांनाच मिळणार सवलत

संक्रमण शिबिर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंकडे भाडे व त्यावरील व्याजापोटी १२९.९२ कोटी रक्कम थकीत आहे. या योजनेअंतर्गत जे भाडेकरू संपूर्ण थकीत रक्कम भरतील त्यांनाच सवलत लागू राहील.

- विनोद घोसाळकर

सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, म्हाडा.

......................

योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मंडळाच्या विविध विभागांनी २८ फेब्रुवारीपर्यंत केलेली भाडेवसुली

१) अ विभाग - ११ लाख ५६ हजार ३५९

२) ब २ विभाग - १ लाख ८१ हजार ९०७

३) क १ विभाग - ८ लाख ७५ हजार ३८२

४) क २/३ विभाग - ८ लाख ९९ हजार ५३

५) ड १ विभाग - २ कोटी ४ लाख ९२ हजार ९८९

६) ड २ विभाग - ३ लाख ३४ हजार १४०

७) ड ३ विभाग - ५१ हजार ७५

८) ई १ विभाग - ११ लाख ४५ हजार ३४६

९) ई २ विभाग - ३२ लाख १७ हजार ५००

१०) ग दक्षिण विभाग - २७ लाख ८९ हजार ९५८

११) ग उत्तर विभाग - ११ लाख ०७ हजार ४१२

१२) फ उत्तर विभाग - १८ लाख ८७ हजार ३१९ रु. २२ लाख ५१ हजार ५६४

१३) फ दक्षिण विभाग - २० लाख ८९ हजार ४००

एकूण - ३ कोटी ८४ लाख ७९ हजार ४०४

.......................................

Web Title: Residents paid arrears of Rs 3 crore 84 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.