म्हाडा कॉलनीत नालेसफाई न झाल्याने रहिवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:37 AM2020-06-24T01:37:40+5:302020-06-24T01:37:47+5:30

नाल्यातील कचऱ्याचे ढीग या झाडांमुळे अडले जातात. पावसाळ्यात कचºयामुळे हा नाला तुंबून येथे दुर्गंधी तसेच डासांचे प्रमाण वाढते.

Residents harassed due to lack of sanitation in Mhada Colony | म्हाडा कॉलनीत नालेसफाई न झाल्याने रहिवासी हैराण

म्हाडा कॉलनीत नालेसफाई न झाल्याने रहिवासी हैराण

Next

मुंबई : मुलुंड पूर्वच्या म्हाडा कॉलनी येथील नाल्याची अद्यापही सफाई न झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. म्हाडा कॉलनीच्या मागे खाडीलगतचा परिसर आहे. खाडीलगत असणारा हा नाला दरवर्षी साफसफाई च्या बाबतीत दुर्लिक्षत राहत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. खाडीलगतचा परिसर असल्यामुळे या नाल्याभोवती झाडांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नाल्यातील कचऱ्याचे ढीग या झाडांमुळे अडले जातात. पावसाळ्यात कचºयामुळे हा नाला तुंबून येथे दुर्गंधी तसेच डासांचे प्रमाण वाढते. यामुळे म्हाडा कॉलनी परिसरात रोगराई पसरण्याचे प्रमाणदेखील दरवर्षी वाढते. म्हाडा कॉलनी परिसरात तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेकदा रिहवासी वस्तीत साप आढळून येतात. यंदा पावसाळा सुरू होऊनदेखील या नाल्याची साफसफाई झालेली नाही. त्यातच कोरोनासारखा आजार मुंबईत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नाला वेळोवेळी साफ करण्यात यावा यासाठी रहिवाशांनी पालिकेकडे वारंवार अर्ज केले आहेत. परंतु पालिकेचे याकडे दरवर्षी दुर्लक्ष होत आहे.
>पालिकेचे कर्मचारी या नाल्याची साफसफाई करण्यास आले असता नाल्यातील कचरा किनार्यावर काढून ठेवतात. परिणामी पावसाळ्यात नाला तुंबल्यावर पुन्हा तो कचरा नाल्यात जातो. याविषयी मी पालिकेच्या अधिकार्यांकडे तक्र ार केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पालिकेने या नाल्याची लवकरात लवकर सफाई करावी अन्यथा म्हाडा कॉलनी परिसरात रोगराई पसरू शकते.
- रवी नाईक, अध्यक्ष, मुलुंड म्हाडा कॉलनी असोसिएशन

Web Title: Residents harassed due to lack of sanitation in Mhada Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.