निवासी डॉक्टरांचा बहिष्कार कायम !
By Admin | Updated: November 27, 2015 03:09 IST2015-11-27T03:09:31+5:302015-11-27T03:09:31+5:30
महाराष्ट्र असोसिएशन आॅप रेसिंडट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने गुरुवारपासून राज्यभरातील रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील(ओपीडी) कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे.

निवासी डॉक्टरांचा बहिष्कार कायम !
मुंबई : महाराष्ट्र असोसिएशन आॅप रेसिंडट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने गुरुवारपासून राज्यभरातील रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील(ओपीडी) कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे. आज दिवसभर ओपीडीत काम न केल्याने काही प्रमाणात त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. आपल्या मागण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी तब्बल सहा तास चर्चा केली. मात्र कोणतेच ठोस आश्वासन दिल्याने बहिष्काराचा निर्णय कायम ठेवला असल्याचे मार्डच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर येथील डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत संघटनेने बाह्यरुग्ण विभागात निवासी डॉक्टरांनी काम न करण्याचा निर्णय घेत बहिष्कार टाकला. या पार्श्वभूमीवर तावडे यांच्याशी झालेल्या चर्चेत मार्डच्या हाती आश्वासनांचे गाजरच मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चर्चेत केवळ क्षयग्रस्त डॉक्टर व गर्भवती महिला डॉक्टरांना वेतन रजा मिळणे ही मागणी तत्त्वत: मान्य केले. मात्र अन्य मागण्यांबद्दल लिखित स्वरुपातील आश्वासन न मिळाल्याने बहिष्काराचा कालावधी वाढवित असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)