खेड्यांतील जीवनशैलीवर संशोधकांकडून अभ्यास सुरु
By Admin | Updated: January 7, 2015 02:23 IST2015-01-07T02:23:15+5:302015-01-07T02:23:15+5:30
भारतात दरवर्षी ९० जणांना तर खेड्यांमध्ये ४५ जणांना कर्करोगाची लागण होते. शहराची लोकसंख्या अधिक असतानाही खेडेगावात कर्करोगाचे प्रमाण अधिक कसे?

खेड्यांतील जीवनशैलीवर संशोधकांकडून अभ्यास सुरु
मुंबई : भारतात दरवर्षी ९० जणांना तर खेड्यांमध्ये ४५ जणांना कर्करोगाची लागण होते. शहराची लोकसंख्या अधिक असतानाही खेडेगावात कर्करोगाचे प्रमाण अधिक कसे? यामागची नेमकी कारणे कोणती ? हे शोधण्यासाठी जगभरातील संशोधक खेड्यांमधील जीवनशैलीचा अभ्यास करत असल्याचे, पद्मश्री राजेंद्र बिडवे यांनी सांगितले.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये आयोजित ‘आॅन टार्गेटिंंग अॅण्ड पोस्ट ट्रान्सलेशन मॉडीफीकेशन इन हेल्थ अॅण्ड डिसिजेस’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी तज्ज्ञांनी कर्करोगाचे जंतू नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
जगभरात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉ. बिडवे यांनी सांगितले. कर्करोगाच्या जंतूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भारतातील शहरी भागात राहणाऱ्या एक लाख लोकांपैकी ९0 जणांना कर्करोगाची बाधा होते. खेडेगावात हा आकडा ४५ असून त्याला येथील जीवनशैली कारणीभूत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. डोके आणि मानेचा कॅन्सर, फुफ्फुसे, यकृत, नेओप्लासीआ कर्करोग, स्तनाचा कर्करोग, कोलोन कॅन्सर अशा उपचाराबाबतही चर्चा झाली. (प्रतिनिधी)