Join us  

एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेली घरे लवकरच नावावर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 5:08 PM

मेट्रोच्या कामामुळे रखडलेल्या संजयगांधी नगर, पंप हाऊस या दोन्ही भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी स्वत: बोलण्याचे आश्‍वासन एमएमआरडीएच्या आयुक्तांनी  आमदाराना दिले.

मुंबई :- जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेल्या सदनिका आता पुर्नखरेदी केलेल्या खरेदीदारांच्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्‍न विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर व एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांच्या समवेत आज पार पडलेल्या बैठकीत याप्रश्‍नावर मार्ग निघाला आहे. एमएमआरडीए वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांनी तसे पत्र तात्काळ एमएमआरडीएला द्यावे, अशी सूचना करत हे पत्र प्राप्त होताच आठवड्याभरातच हा प्रश्‍न निकाली काढण्यात येईल, असे आश्‍वासनही आयुक्तांनी आमदार  वायकर यांना दिले. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्‍या एमएमआरडीए वसाहतीतील प्रलंबित समस्या तसेच मेट्रोच्या कामामुळे बाधित होणार्‍या कुटुंबाच्या समस्या याबाबत  वायकर तसेच एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांची संयुक्त बैठक आज एमएमआरडीए कार्यालयात पार पडली. यावेळी नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, विधानसभा समन्वयक बावा साळवी, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख प्रदिप गांधी, मंदार मोरे, अमर मालवणकर, शाखा समन्वयक उमेश कदम,  एमएमआरडीए वसाहतीतील रहिवाशी, मेट्रोच्या कामामुळे बाधित होणारी कुटुंबे, एमएमाआरडीएचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

एमएमआरडी वसाहतीतील एका इमारतीला ओ.सी मिळून १० वर्ष पूर्ण झालेली असतील अशी घरे जर पुर्नखरेदी करण्यात येत असतील तर ती पुर्नखरेदी दाराच्या नावावर का करण्यात येत नाही, एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांकडून आडकाठी का दाखविण्यात येते असा सवाल आमदार  वायकर यांनी उपिस्थित केला., १० वर्षे पूर्ण झालेल्या सोसायट्यांनी तसे पत्र एमएमआरडीएला दिल्यास हा प्रश्‍न आठवड्याभरात निकाली काढण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी यावेळी दिले. 

मेट्रोच्या कामामुळे रखडलेल्या संजयगांधी नगर, पंप हाऊस या दोन्ही भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी स्वत: बोलण्याचे आश्‍वासन एमएमआरडीएच्या आयुक्तांनी  आमदाराना दिले. मुंबई आय.आय.टी पवई पुर्वापार भांगशेला व पेरुबाग येथील आदिवासी पाड्यांचे रखडलेल्या पुनर्वसनाचा प्रश्‍नही मार्गी लावावा अश्या सूचना वायकर यांनी यावेळी आयुक्तांना केल्या. 

टॅग्स :एमएमआरडीए