Join us

समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात  निदर्शने आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 18:48 IST

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहेत.

मुंबई- एनसीबीचे कर्तबगार प्रामाणिक अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने  मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे  यांच्या नेतृत्वात आज दि.27 ऑक्टोबर रोजी  मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन करण्यात आली. या मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर  जिल्हाध्यक्ष संजय पवार कामगार नेते प्रकाश जाधव  जिल्हाध्यक्ष हरिहर जाधव जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे वैशालीताई संगारे सचिन आठवले शिरीष चिकलकर विजय शेट्टी सुमित वजाळे रवि गायकवाड विजय वाघमारे  आदी उपस्थित होते

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर नाही. मात्र ते मागासवर्गीय अधिकारी असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे. ड्रग्स च्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे करीत आहेत.त्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचू नये; मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभे आहे.त्यामुळे समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी रिपब्लिकन हा मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :समीर वानखेडेअमली पदार्थनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो