रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे आज राज्य अधिवेशन

By Admin | Updated: April 5, 2015 01:49 IST2015-04-05T01:49:23+5:302015-04-05T01:49:23+5:30

खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य अधिवेशन रविवारी सायंकाळी येथील बीकेसी मैदानावर होणार आहे.

Representatives of the Republican Party of India today | रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे आज राज्य अधिवेशन

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे आज राज्य अधिवेशन

मुंबई : खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य अधिवेशन रविवारी सायंकाळी येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. या अधिवेशनात पक्षाचा सामाजिक व आर्थिक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे आठवले यांनी सांगितले.
रिपाइंच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात मंत्रिपदाची संधी द्यावी, असा एकमुखी ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Representatives of the Republican Party of India today