रिपोर्टकार्ड
By Admin | Updated: September 25, 2014 23:04 IST2014-09-25T23:04:06+5:302014-09-25T23:04:06+5:30
रिपोर्टकार्ड...

रिपोर्टकार्ड
र पोर्टकार्ड...आ. नसीम खानचांदिवली विधानसभा-चांदिवली मतदारसंघाचा कायापालट केला. हिंदू स्मशानभूमींचे नुतनीकरण, गणपती विसर्जन घाटांचे नुतनीकरण, रस्त्यांची कामे, मेट्रोचा प्रारंभ केला, मेट्रोची मतदारसंघात तब्बल तीन स्टेशन्स-महिलांसाठी ५० खाटांचे प्रसुतिगृह सुरु केले, हिरानंदानीमध्ये पादचारी पूल निर्माण, सहार टी-टू ला जाण्यासाठी सफेदपूलपासून स्वतंत्र रस्ता निर्माण केला, पूर्वी विमानतळावर जाण्यासाठी ४५ मिनीटे लागायची आता केवळ १२ मिनिटे लागतात-नगरसेवकांनी काम न केल्याने महापालिकांच्या ७ शाळांचे नुतनीकरण विशेष फंडातून केले, ७ नवे ज्युनिअर कॉलेज तर ७ नव्या शाळा मतदारसंघात आणल्या, पोलीस वसाहतींची दुरुस्ती फंडातून केली, एलबीएस मार्गाची दुरुस्ती एमएमआरडीच्या फंडातून करुन घेतली.-मतदारसंघातील डोंगरी भागात पाणी पोहोचवले, टाक्याबांधून त्यातून पाणी वरपर्यंत नेले, २५००० कुटुंबांची ही पाण्याची समस्या सोडवली-१५ वर्षांपूर्वी गुन्हेगारी खूप होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिने विनोबा भावे नगर आणि पवई पोलीस स्टेशन हे दोन नवे पोलीस स्टेशन्स उभारले, एनएसजी हब मतदारसंघात आणले.........................................................................ईश्वर तायडेउमेदवार, मनसे -जी कामे केल्याचा दावा आमदार नसीम खान करत आहेत, ती कामे त्यांची नसून नगरसेवकांची आहेत. आमदार खान यांनी केवळ नारळ फोडण्याची कामे केलीत, प्रत्यक्षात काहीही विकासकामे झालेली नाहीत. -रस्ते केल्याचा दावा आमदार करत असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची प्रचंड दूरवस्था आहे. आमदार नसीम खान यांच्याच घरासमोरुन जाणार्या अत्यंत रहदारीच्या अंधेरी-कुर्ला रोडचे गेल्या १५ वर्षांत ते साधे रुंदीकरण करु शकले नाहीत. -एकाही हिंदू स्मशानभूमीचे काम त्यांनी केलेले नाही. पवई तलावाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेच्या आणि केंद्राच्या फंडातून झालेले आहे. जे प्रसुतीगृह सुरु केल्याचा दावा आमदार करत आहेत, तिथे प्रत्यक्षात घाईघाईत उद्घाटन करुन फक्त ओपीडी सुरु करण्यात आले.-संदेशनगर, बैलबाजार, जरीमरी इथला नागरिकांना गेल्या १५ दिवाळींपासून घर मिळेल, पुनर्विकास होईल, अशी आश्वासने विद्यमान आमदार देत आहेत. पण प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. रेशनिंग मिनिस्टर असूनही चांदिवलीत रेशनिंग कार्यालय ते आणू शकले नाहीत. रेशनिंगच्या कामासाठी अजूनही लोकांना नेहरुनगरला जावे लागते. -पोलीस स्टेशन उभारल्याचा दावा आमदार करत असले तरी देखील मतदारसंघात गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. १५ वर्षांत विकास तर दूर पण मुलभूत समस्या देखील सुटलेल्या नाहीत. मंत्री असूनही ते नगरसेवकांनी करायच्या कामांवर दावा करत राहिले.