मुंबई : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा व त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना बुधवारी दिले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मिहीरची बीएमडब्ल्यू गाडी एका दुचाकीला धडकून कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे पती प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी ९ जुलै रोजी मिहीरला अटक केली. अपघाताच्या वेळी मिहीर शहाचा ड्रायव्हर राजऋषी बिडावतही गाडीमध्ये होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली.