बदलापूरात २० उमेदवारी अर्ज बाद

By Admin | Updated: April 2, 2015 22:51 IST2015-04-02T22:51:47+5:302015-04-02T22:51:47+5:30

कुळगांव बदलापूर नगरपालिका निवडणुकीतील छाननीत २० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्र मांक १ मधून शिवसनेचे

Replacement After applying for 20 nomination papers | बदलापूरात २० उमेदवारी अर्ज बाद

बदलापूरात २० उमेदवारी अर्ज बाद

बदलापूर : कुळगांव बदलापूर नगरपालिका निवडणुकीतील छाननीत २० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्र मांक १ मधून शिवसनेचे तुकाराम म्हात्रे यांचा एकमेव अर्ज असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच प्रभाग क्र. १७ मध्ये भाजपाच्या निशा घोरपडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज उरल्याने त्यांचीही निवड बिनविरोध होणार आहे.
छाननी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांच्यामार्फत बुधवारी झाली. तेव्हा अनेक उमेदवारांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने अर्ज बाद ठरवण्यात आले. तर काही उमेदवारांनी अर्जांसोबत कागदपत्र न दिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले. ४७ प्रभागांसाठी एकूण २२४ अर्ज दाखल झाले
होते.
यातील २० उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर २०४ वैध ठरवण्यात आले असून १७ उमेदवारांनी दुबार अर्ज दाखल केले आहेत. प्रत्यक्षात १८७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. उमेदवार निश्चित झाल्याने आता निवडणुकीच्या खऱ्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक शिवसेना विरुध्द भाजपा अशीच रंगणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Replacement After applying for 20 nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.