राज्य उत्पादन शुल्क विभागात समुपदेशनाद्वारे बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:40 IST2018-06-20T04:40:20+5:302018-06-20T04:40:20+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यभरातील १९६ दुय्यम निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागात समुपदेशनाद्वारे बदली
- खलील गिरकर
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यभरातील १९६ दुय्यम निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. पण या बदल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे विभागाच्या इतिहासात प्रथमच राज्य सरकारच्या समुपदेशनाद्वारे बदली या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली. या धोरणाद्वारे अधिकाºयांकडून बदल्यांसाठी त्यांच्या प्राधान्याचे १० पर्याय मागवण्यात आले होते. त्यामुळे या बदल्यांमुळे तब्बल ९५ टक्के अधिकाºयांना त्यांच्या मनाप्रमाणे पोस्टिंग मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
राज्य सरकारने ९ एप्रिल २०१८ ला समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण याबाबत शासन निर्णय जाहीर केला होता. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत उत्पादन शुल्क विभागातील अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, सह आयुक्त तनुजा दांडेकर, उपायुक्त (प्रशासन) शंकर जगताप व राज्यातील सर्व विभागीय स्तरावरील उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील एका महाविद्यालयात राज्यातील दुय्यम निरीक्षकांना बोलावण्यात आले होते. समुपदेशनाद्वारे बदली धोरणाची यावेळी त्यांना माहिती देण्यात आली व बदलीसाठी कशाप्रकारे प्राधान्यक्रम भरायचे याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले. विभागातील ९५ टक्के उप निरीक्षकांना मनाप्रमाणे बदली मिळाली आहे. प्राधान्यक्रम भरून दिल्यानंतर प्रशासनाने विनंती, प्राधान्यक्रम व प्रशासकीय सोय पाहून त्वरित बदल्या जाहीर करण्यात आल्या होत्या.