रिपाईची मोर्चे बांधणी
By Admin | Updated: September 24, 2014 00:06 IST2014-09-24T00:06:12+5:302014-09-24T00:06:12+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात रिपाइंचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष फारूख दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे

रिपाईची मोर्चे बांधणी
कसारा : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघात रिपाइंचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष फारूख दळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे.
सध्या युती- महायुतीचे भिजत घोंगडे पडले आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कोणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला नाही, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंला विधानसभेला किती जागा मित्रपक्षांकडून मिळणार, हेसुद्धा गुलदस्त्यात आहे. दलित व आदिवासींचे संख्याबळ जादा असल्याने मोर्चेबांधणी सुरु आहे.