आशागड-धुंदलवाडी रस्त्याची दुरुस्ती होणार
By Admin | Updated: February 12, 2015 22:47 IST2015-02-12T22:47:01+5:302015-02-12T22:47:01+5:30
आशागड-धुंदलवाडी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन तीन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एन. तोटावर यांनी सांगितले.
आशागड-धुंदलवाडी रस्त्याची दुरुस्ती होणार
तलासरी : आशागड-धुंदलवाडी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन तीन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एन. तोटावर यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणूच्या अखत्यारीत असलेल्या आशागड-धुंदलवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली.
या रस्त्याच्या दुरूस्तीवर लाखो रू. खर्च होऊनही रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने सा.बा विभागाकडून दुरूस्ती बाबत टाळाटाळ होत आहे. नागरीकांना व वाहनचालकांना या रस्त्यावरून जाणे त्रासाचे झाले आहे.
तलासरी धुंदलवाडी आशागड हा राज्यमार्ग महत्वाचा असून याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष जाणीवर्पूक होत असल्याने रस्ता दुरूस्तीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षातर्फे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी लहानु कोम यांनी दिला आहे. रस्ता दुरूस्ती बाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पत्र मिळाल्याचे त्यांनी सांगितले.