Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेकडून ३२ पादचारी पुलांची दुरुस्ती; मार्च ते नोव्हेंबरदरम्यान बांधले चार पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 02:45 IST

अलीकडेच पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिजसाठी व्यस्त रेल्वे ट्रॅक ओलांडून नवीन स्टील ‘ओपन वेब गर्डर’ यशस्वीरीत्या लाँच केले गेले.  

मुंबई : लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. कुर्ला - शीव , डोंबिवली, ठाकुर्ली आणि टिटवाळा येथे नवीन पादचारी पूल बांधण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सँडहर्स्ट रोड, भायखळा (२), परळ, दादर, शीव, मुलुंड (२), ठाणे, कळवा (२), किंग्ज सर्कल (२), पनवेल (२)  तसेच उल्हासनगर, बदलापूर, खडवली, वाशिंद, आसनगाव, इगतपुरी, भिवंडी रोड, खामण रोड, खारबाव, जुचंद्र, निळजे, दातीवली, तळोजा, कळंबोली, चौक आणि मोहोपे या २८ स्थानकांवर ३२ पादचारी  पुलांच्या दुरुस्तीचे काम यशस्वीरीत्या पार पडले. कल्याण येथील खर्डी, उंबरमाळी, शीळफाटा आणि ब्रिटिश काळातील वालधुनी रोड ओव्हर ब्रिजच्या रस्त्यांच्या पुलांची दुरुस्ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली.अलीकडेच पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिजसाठी व्यस्त रेल्वे ट्रॅक ओलांडून नवीन स्टील ‘ओपन वेब गर्डर’ यशस्वीरीत्या लाँच केले गेले.  

जुने पादचारी पूल काढून टाकण्यात आलेवडाळा रोड येथील जीर्ण पादचारी पुलांचे २ स्टील स्पॅन, अंबरनाथ येथील पादचारी पुलाचा एक स्पॅन, आंबिवली येथे एक स्पॅन, अटगाव येथे २ स्पॅन, वाशिंद रेल्वे स्थानकातील १०० वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पुलांचे दोन स्पॅन्स काढून टाकण्याचे काम केले. 

टॅग्स :मध्य रेल्वे