प्रसिद्ध चित्रपट निर्माते चंपक जैन अनंतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:19 IST2019-11-02T01:19:12+5:302019-11-02T01:19:19+5:30

अभिनेता सोनू सूद यांनी टिष्ट्वटरद्वारे जैन यांना श्रद्धांजली अर्पण केली

Renowned filmmaker Champak Jain Anant | प्रसिद्ध चित्रपट निर्माते चंपक जैन अनंतात

प्रसिद्ध चित्रपट निर्माते चंपक जैन अनंतात

मुंबई : व्हिनस रेकॉर्ड अँड टेप्सचे मालक व चित्रपट निर्माते चंपक जैन यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईत निधन झाले, ते ५२ वर्षांचे होते. सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंपक जैन यांनी ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाचे व शाहरुख खान यांनी काम केलेल्या ‘जोश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. ‘खिलाडी’, ‘हमराज’ आदी चित्रपटांना त्यांनी साहाय्य केले होते. व्हिनस ग्रुपचे मालक असलेल्या सात भावंडांपैकी ते एक होते. त्यांना रतन, गिरीश, गणेश, उमेद, रमेश व भंवर जैन असे सहा बंधू आहेत.

अभिनेता सोनू सूद यांनी टिष्ट्वटरद्वारे जैन यांना श्रद्धांजली अर्पण केली. जैन यांचे निधन अत्यंत धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासोबत अत्यंत हृद्य आठवणी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे टिष्ट्वट त्यांनी केले. गायक मिका सिंह यांनीदेखील जैन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. जैन अत्यंत चांगले व मदत करणारे गृहस्थ होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी आदरांजली त्यांनी अर्पण केली.

Web Title: Renowned filmmaker Champak Jain Anant