गॅसवाहिन्यांचे नूतनीकरण सुरू
By Admin | Updated: November 28, 2014 22:41 IST2014-11-28T22:41:55+5:302014-11-28T22:41:55+5:30
बीपीसीएलच्या जुन्या गॅसवाहिन्या बदलण्याच्या 18क्क् कोटी खर्चाच्या कामाला शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली आहे.

गॅसवाहिन्यांचे नूतनीकरण सुरू
उरण : बीपीसीएल प्रशासनाने पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार विविध ठेकेदारीच्या कामात नलिकाग्रस्त प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतल्याने बीपीसीएलच्या जुन्या गॅसवाहिन्या बदलण्याच्या 18क्क् कोटी खर्चाच्या कामाला शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. मात्र चारफाटा परिसरात भूमिगत गॅसवाहिन्यांच्या वरती उभारण्यात आलेल्या झोपडीधारकांमध्ये कारवाईच्या धसक्याने प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. अनेक झोपडीधारकांनी कारवाईच्या भीतीने स्वत:च झोपडय़ा, टप:या पाडून त्यातील सामान हलविण्यास सुरुवात केली आहे.
येथील ओएनजीसी, बीपीसीएल दरम्यान भूमिगत वायुवाहिन्या टाकण्यात आल्यामुळे कोटनाका, काळाधोंडा, चाणजे परिसरातील 45 शेतकरी बाधित झाले आहेत. सुमारे 23 वर्षापूर्वी टाकण्यात आलेल्या वायुवाहिन्या टाकताना सिडको, बीपीसीएलने जागेच्या मोबदल्याबरोबरच नलिकाग्रस्त शेतक:यांना नोक:या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतक:यांना 23 वर्षानंतरही नोक:या देण्यात बीपीएल प्रशासन अपयशी ठरले होते.
प्रकल्पग्रस्तांनी नोक:यांसाठी अनेकदा संघर्ष केला. मात्र त्यातून प्रकल्पग्रस्तांच्या हाती काही एक आले नाही. ओएनजीसी, बीपीएल दरम्यान 23 वर्षापूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वायुवाहिन्या आता जीर्ण झाल्या आहेत. या वायुवाहिन्या न बदलल्यास वायुगळतीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची आणि प्रचंड वित्त, जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे करीत बीपीसीएलने 23 नोव्हेंबरपासून जीर्ण वायुवाहिन्या बदल्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या वायुवाहिन्या टाकण्याचे काम सुरु करताना प्रकल्पग्रस्तांशी संघर्ष होणार असल्याची जाणीव झाल्याने हे काम सुरु करण्यासाठी कंपन्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी संबंधित प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, आमदार मनोहर भोईर, बीपीसीएल-ओएनजीसी प्रशासन अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांशी अनेक वेळा चर्चा केली. त्यानुसार नलिकाग्रस्तांना ठेकेदारीच्या कामात सामावून घेण्यात आले आहे. शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाले. 7 किमी. अंतराची जुनी पाइपलाइन बदलण्याच्या कामावर 18क्क् कोटी रुपये खर्च होईल, त्यापैकी चारफाटा ते नवीन शेवा दरम्यान सव्वा किमी अंतरार्पयत पाइपलाइन टाकण्याचे काम बाकी असल्याची माहिती बीपीसीएल अधिकारी सुनील धकाते यांनी दिली. भूमिगत वायुवाहिन्या टाकण्याचे काम 15 दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचा मानसही धकाते यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
4सव्वा किमी अंतराच्या चारफाटा-नवीन शेवा दरम्यानच्या मार्गावरच अनेक झोपडय़ा, टप:या बेकायदेशीररीत्या उभारण्यात आल्या आहेत. या बेकायदेशीर झोपडपट्टीमुळे नव्याने वायुवाहिन्या टाकण्याचे काम मागील काही वर्षापासून रखडले होते.
4आता या मार्गावरील बेकायदेशीर झोपडय़ांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.