राणेंवर केणेंचा असंतोष

By Admin | Updated: August 10, 2015 23:43 IST2015-08-10T23:43:24+5:302015-08-10T23:43:24+5:30

काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी रविवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे केडीएमसीत काँग्रेसच्या गोटात राणेंविषयीचा असंतोष पसरला. पक्षाचे महापालिका प्रवक्ते संतोष केणे

Renaver Kane's dissatisfaction | राणेंवर केणेंचा असंतोष

राणेंवर केणेंचा असंतोष

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली
काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी रविवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे केडीएमसीत काँग्रेसच्या गोटात राणेंविषयीचा असंतोष पसरला. पक्षाचे महापालिका प्रवक्ते संतोष केणे यांनी राणेंवर सडकून टीका केली. राणे हे विरोधी पक्षनेते नसून ते पक्षविरोधी नेते होते. त्यांना पक्षाने सर्वकाही दिले. त्याची त्यांनी जाण ठेवली नाही. नेहमीच दुसऱ्याच्या ताटाकडे त्यांनी बघितले. स्वत:च्या ताटात काय आहे, याकडे त्यांनी काणाडोळा केला. एकही आंदोलन नाही की, ठोस कार्यवाही नाही. अशा स्थितीत त्यांनी पक्षाची वाताहतच केली.
त्यांना पक्षाने स्टँडिंगचे सदस्यही बनवले. परंतु, त्यांनी तर तेथेही ‘अंडरस्टँडिंग’ करत सत्ताधाऱ्यांच्या हो ला हो केले. कधीही विरोध नाही की, नागरिकांच्या हिताचे निर्णय नाहीत. ते शिवसेनेतूनच येथे आले होते, तरीही पक्षाने पाहुण्यांचा सन्मान करत त्यांना प्रवक्ते, स्टँडिंग सदस्य, गटनेते, स्वीकृत नगरसेवक आणि आता विरोधी पक्षनेतेपद दिले.
आणखी काय द्यायला हवे होते? निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून त्यांना हे सर्व दिले. त्याची कृतघ्न परतफेड त्यांनी अशा पद्धतीने केली. सत्ताधाऱ्यांच्या तंबूला बाम्बू देण्याचे काम त्यांनी नेहमी केले, म्हणूनच की काय, त्यांना शिवसेनेने परत घेतले. तसेच विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यावर त्यांनी तातडीने पालकमंत्र्यांची भेट घेतली होती.
नुकतेच पक्षाचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील ठाकुर्लीत आले होते. तेव्हाही, हे फारसा इंटरेस्ट घेत नव्हते. अतिधोकादायक इमारतींबाबतच्या गंभीर प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत राणे हे आले नाहीत, हाच काय तो यांचा नागरिकांसाठीचा कळवळा का? नागरिक याची नोंद घेतातच, हे त्यांनी जाणले नाही. कारण त्यांनी कधी निवडणूक लढवलीच नाही की, जनतेची कामेही केलेली नाहीत. आता तर त्यांना वॉर्डही नाही.
जनतेच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका त्यांनी कधी घेतलेली नाही. अन्यथा, विरोधी पक्षनेत्याने कुठूनही उभे राहावे, ते निवडून येणारच, असा आत्मविश्वास त्यांना नाही, म्हणूनच तर निवडणुका आल्या की, पळवाट शोधायची, असा पवित्रा ते घेतात, असेही ते म्हणाले.

ज्यांनी केवळ विधानसभा असो की, अन्य निवडणुका, यामध्ये तिकिटासाठी, पदासाठी आणि अन्य बाबींसाठी ज्यांनी पक्षाचा फायदा घेतला, त्यांनी माझ्यावर टीका करणे किती योग्य आहे. काँग्रेसला गटबाजीने पोखरले आहे. येथे केवळ सचिन पोटे आणि काही जण वगळता मला कोणीही कधीही साथ दिलेली नाही. जे आता बोलत आहेत, त्यांनी सभागृहात कधी आवाज उठवला आहे का? कोणत्याही विषयावर त्यांनी भाष्य करून दाखवावे, ते कधीही त्यांनी केले नाही. शिवसेनेत मी आलो असून स्वगृही आल्यासारखे वाटत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यातील कलागुणांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वस्त केले आहे. कोणतीही अपेक्षा न बाळगता मी पक्षात प्रवेश केला आहे.
- विश्वनाथ राणे

सदाशिव शेलार म्हणतात, राणे गद्दार
त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्या प्रतिक्रिया केडीएमसीत उमटू लागल्या. सध्याच्या पक्षाचे गटनेते शेलार यांनी तातडीने व्हॉट्सअ‍ॅपवर ‘गद्दार’ अशी प्रतिक्रिया
दिली.

Web Title: Renaver Kane's dissatisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.