Join us  

मुंब्रा स्टेशनच नाव बदलून मुंब्रादेवी करा; भाजप नेते मोहित कंबोज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 1:12 PM

मुंब्रा रेल्वेस्थानकाचे नाव बदलून मुंब्रादेवी देण्याची मागणी भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई-  मुंब्रा रेल्वेस्थानकाचे नाव बदलून मुंब्रादेवी देण्याची मागणी भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी आज ट्विट केले आहे.

'आपण सर्वजण मुंब्रा देवीचा अलौकिक इतिहास जाणतो भविष्यात हे स्थानक देवीच्या नावे ओळखले गेले तर आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असं ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. अनेक दिवसापासून मुंब्रा रेल्वेस्थानक नावाने ओळखले जाते. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी या स्थानकाचे नाव मुंब्रादेवी करण्याची मागणी केली आहे.  

“… तर ठाण्यातून निवडणूक का लढवत नाहीत?

हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनीएकनाथ शिंदे यांना दिलं होतं. यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. तसंच ठाण्यातून का निवडणूक लढवत नाहीत असा सवालही केलाय.

पोलीस ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाच्या आमदाराला कधीही ताब्यात घेण्याची शक्यता

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान करत आहेत. पण वरळी का? जर आदित्य ठाकरेंना इतकाच विश्वास असेल तर त्यांनी ठाण्यात जावं आणि एकनाथ शिंदेंविरुद्ध निवडणूक लढवावी. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांच्यामुळे जिंकले होते,” असं मोहित कंबोज म्हणाले. 

शिंदे गटाच्या नेत्याचाही निशाणा

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकलं. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोक ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. तसेच तुम्हाला एक प्रश्न विचारते. वरळीतून आपल्याला ६ हजारांच्यावर नोटाची मते मिळाली आहेत. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचे साधे जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर तुम्हाला भेटता येत नाही अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयभाजपा