पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मे पूर्वी दूर करा, भातखळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 2, 2025 18:49 IST2025-05-02T18:48:03+5:302025-05-02T18:49:05+5:30

आज कांदिवली पूर्व विधानसभेतील हनुमान नगर येथील पठाण चाळ एस. आर. ए. पासून ते पाल स्कूल, प्रमोद नवलकर गार्डन, अटळ बिहारी वाजपेयी समज केंद्र पर्यंत त्याच बरोबर पोईसर येथील बाकीच्या सर्व ठिकाणच्या नालेसफाई कामांची आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांची त्यांनी पाहणी केली.

Remove the silt created by the railway for the work on the railway bridge at Poisar before May 15, Bhatkhalkar instructs the officials | पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मे पूर्वी दूर करा, भातखळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मे पूर्वी दूर करा, भातखळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई-कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील पठाण चाळ येथे एसटीपीच्या कामाकरता पोईसर नदीच्या प्रवाहात घातलेला भराव तसेच पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मे पूर्वी दूर करा.अन्यथा एसटीपीचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाही केली जाईल असा इशारा कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज कामांच्या पाहणी करताना दिला. 

आज कांदिवली पूर्व विधानसभेतील हनुमान नगर येथील पठाण चाळ एस. आर. ए. पासून ते पाल स्कूल, प्रमोद नवलकर गार्डन, अटळ बिहारी वाजपेयी समज केंद्र पर्यंत त्याच बरोबर पोईसर येथील बाकीच्या सर्व ठिकाणच्या नालेसफाई कामांची आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांची त्यांनी पाहणी केली. या कामांवर कायम लक्ष्य ठेऊन येत्या दि, १५ मे च्या आधी सर्व कामं पूर्ण करा असे निर्देश देखील आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

त्याच बरोबर हनुमान नगर व पोईसर येथील अंतर्गत रस्त्यांचे सीसी पॅसेजची कामं सुद्धा दि,१५ मे च्या आधीच पूर्ण करा अशा सूचना देखील त्यांनी पाहणी दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दि,१५ मे नंतर मी पुन्हा पाहणीसाठी येईन,आणि या कामात जर कोणी गडबड केली तर त्यांच्यावर कठोर कारवाही केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

या कामांवर लक्ष्य ठेवण्या करता महानगपालिकेने निर्माण केलेल्या यंत्रणेला माहिती दिली जात आहे का? तसेच नाले सफाईची माहिती अप वर उपलोड केली जात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. 
 

Web Title: Remove the silt created by the railway for the work on the railway bridge at Poisar before May 15, Bhatkhalkar instructs the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.