Join us  

रिलायन्सकडून दररोज १ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:58 AM

कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांत मोफत वाटप

ठळक मुद्देरिलायन्स द्रवरूप प्राणवायूचे उत्पादन करीत नाही.  मात्र,  कोरोना काळात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज वाढल्याने त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रिजने पुढाकार घेतला असून, कंपनीच्या विविध रिफायनरीमध्ये सध्या प्रतिदिन १ हजार टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. 

रिलायन्स द्रवरूप प्राणवायूचे उत्पादन करीत नाही.  मात्र,  कोरोना काळात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज वाढल्याने त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या जीवनसंरक्षक  संसाधन तयार करणारा भारतातील सर्वांत मोठा उत्पादक समूह म्हणून रिलायन्स पुढे आला आहे. जामनगर आणि इतर रिफायनरीमध्ये दिवसाला १ हजार मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरूप प्राणवायू तयार केला जात आहे. हे प्रमाण देशातील एकूण प्राणवायू उत्पादनाच्या तुलनेत ११ टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच १० पैकी जवळपास एका रुग्णाची गरजपूर्तता यातून होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांत त्याचे मोफत वितरण केले जात आहे. दिवसाला सुमारे १ लाख रुग्णांना याचा लाभ मिळत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे स्वतः यावर लक्ष ठेवून असून, देशात वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता वाढावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मार्च २०२० पासून रिलायन्सने देशभरात ५५ हजार मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा केला आहे.

हवाईमार्गे वाहतूकnरिलायन्सने सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंड येथून २४ आयएसओ साठवणूक टाक्यांची हवाईमार्गे वाहतूक केली. nयामुळे अतिरिक्त ५०० मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू वाहतूक क्षमता वाढली. या साठवणूक टाक्यांमुळे देशातील वैद्यकीय द्रवरूप प्राणवायूच्या वाहतुकीतील अडथळे कमी होतील. nरिलायन्स पुढील काही दिवसांमध्ये अधिक साठवणूक टाक्यांची हवाईमार्गे वाहतूक करणार असल्याचे सांगण्यात आले.

ऑक्सिजनची अधिकाधिक उपलब्धता होणे गरजेचेदेशात वैद्यकीय ऑक्सिजनची अधिकाधिक उपलब्धता होणे गरजेचे आहे. त्यासाठी रिलायन्स प्रयत्नशील आहे. ऑक्सिजननिर्मिती आणि त्याच्या वाहतुकीसाठी जामनगर रिफायनरीमधील अभियंत्यांनी घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. देशहिताच्या कार्यात आमचे सदैव सहकार्य राहील.- मुकेश अंबानी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रिज

प्रत्येकाचा जीव अनमोल, ताे वाचविण्यासाठी प्रयत्नप्रत्येकाचा जीव अनमोल आहे आणि तो वाचविण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन सर्वतोपरी मदत करील. एकत्रितपणे आपण या कठीण प्रसंगांवर मात करू. - नीता अंबानी, संस्थापक अध्यक्ष, रिलायन्स फाउंडेशन

टॅग्स :रिलायन्सकोरोना वायरस बातम्या