तेरावी प्रवेशाची शेवटची यादी जाहीर

By Admin | Updated: July 3, 2016 01:58 IST2016-07-03T01:58:35+5:302016-07-03T01:58:35+5:30

तेरावी प्रवेशाची तिसरी आणि शेवटची यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली. तिसऱ्या यादीतही अनेक महाविद्यालयांचा कटआॅफ चढाच राहिला. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली.

Release the last list of thirteen entrants | तेरावी प्रवेशाची शेवटची यादी जाहीर

तेरावी प्रवेशाची शेवटची यादी जाहीर

मुंबई : तेरावी प्रवेशाची तिसरी आणि शेवटची यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली. तिसऱ्या यादीतही अनेक महाविद्यालयांचा कटआॅफ चढाच राहिला. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली.
मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती. या नोंदणीत विद्यार्थ्यांनी कला आणि वाणिज्य शाखेची
निवड केल्याचे दिसून आले. पहिल्या दोन गुणवत्ता याद्यांमधील
‘कला’ आणि ‘वाणिज्य’ शाखेच्या कट आॅफमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. शुक्रवारी जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत मात्र वाणिज्य शाखा नंबर वन ठरली. तिसऱ्या यादीतही अनेक नामांकित महाविद्यालयांचा कट आॅफ नव्वद पार असल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)

Web Title: Release the last list of thirteen entrants