सलग १९२ तास काम करणाऱ्या पोलिसांना दिलासा
By Admin | Updated: March 13, 2016 04:40 IST2016-03-13T04:40:57+5:302016-03-13T04:40:57+5:30
कुठल्याही स्वरूपाचा बंदोबस्त नसतानाही नायगाव सशस्त्र दलातील कर्मचारी सतत १९२ राबत असल्याच्या वृत्ताची दखल घेत, वरिष्ठांनी तेथील कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

सलग १९२ तास काम करणाऱ्या पोलिसांना दिलासा
मुंबई : कुठल्याही स्वरूपाचा बंदोबस्त नसतानाही नायगाव सशस्त्र दलातील कर्मचारी सतत १९२ राबत असल्याच्या वृत्ताची
दखल घेत, वरिष्ठांनी तेथील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघणार आहे.
या कर्मचाऱ्यांची व्यथा शनिवारी ‘लोकमत’मध्ये मांडताच वरिष्ठांनी त्याची दखल घेतली. शनिवारी प्रशासन विभागाचे सहआयुक्त अनुपकुमार सिंग यांनी नायगाव सशस्त्र दल विभागाची भेट घेतली. याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे अनुपकुमार सिंग यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत आहोत. काही समस्या भासल्यास त्यांनी थेट तक्रार करावी. त्याचे निवारण करण्यात येईल असे सशस्त्र पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त कैसर खालीद म्हणाले. (प्रतिनिधी)