पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: May 12, 2017 02:06 IST2017-05-12T02:06:17+5:302017-05-12T02:06:17+5:30

विद्याविहार परिसरातील पाइपलाइनभोवती असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेस नेते आमदार नसीम खान यांनी

To rehabilitate the Chief Minister | पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : विद्याविहार परिसरातील पाइपलाइनभोवती असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेस नेते आमदार नसीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले आहे. अन्य प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला परिसरात एचडीआयएल प्रीमियर येथे घरे उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पात सध्या साडेपाच हजारांहून अधिक घरे शिल्लक असल्याने पाइपलाइन बाधितांचेही याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Web Title: To rehabilitate the Chief Minister