पोलिसांकडून नियम धाब्यावर
By Admin | Updated: September 20, 2014 00:57 IST2014-09-20T00:57:05+5:302014-09-20T00:57:05+5:30
वाहतूक पोलिसांनी नियम तोडणा:या वाहनधारकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु सामान्यांवर कारवाई करणारे पोलीस स्वत: मात्र वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत.

पोलिसांकडून नियम धाब्यावर
नामदेव मोरे - नवी मुंबई
वाहतूक पोलिसांनी नियम तोडणा:या वाहनधारकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु सामान्यांवर कारवाई करणारे पोलीस स्वत: मात्र वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. या पोलिसांकडून हेल्मेटचा वापरही केला जात नसून, त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रमध्ये वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अचानक सर्व ठिकाणी नाकाबंदी करून नियम तोडणा:यांकडून दंड वसूल केला जात आहे. अशा प्रकारे 1 सप्टेंबरला तब्बल 1क्82 जणांवर कारवाई केली होती. 18 सप्टेंबरला 827 चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. यामुळे वाहनधारकांमध्येही धडकी भरली आहे. अनेकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस स्वत: मात्र नियम पाळत नसल्याचे सर्रास दिसून येत आहे. नियम तोडणा:या पोलिसांवर मात्र कारवाक्र होत नसल्याने यावर नागरिक नाराज आहेत.
शहरातील बहुतांश पोलीस कर्मचारी मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर करत नाहीत. अनेक वेळा हेल्मेट फक्त मोटारसायकलवर ठेवलेले दिसत असते. अनेक वेळा पोलीस उलट दिशेने वाहने चालवत असल्याचेही निदर्शनास येत असते. पोलीस स्टेशन, महत्त्वाचे चौक या ठिकाणी नियम तोडणा:या पोलिसांना पाहून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
च्कायद्याचे रक्षण करणा:यांना कायद्यामधून सूट देण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस आयुक्त व वाहतूक उपआयुक्तांनी सर्व कर्मचा:यांना नियम पाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. नियम न पाळणा:यांना दुस:यांवर कारवाई करण्याचा अधिकार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
च्वाहतूक पोलिसांच्या कारवाईमधून राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरकारी वाहने व इतर व्हीआयपींना सूट दिली जात आहे. यामुळेही नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून कायदे फक्त सामान्य नागरिकांनाच आहेत का असे विचारले जात आहे.
वाहतूक पोलिसांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारवाई करताना पोलिसांनी नियम तोडल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- अरविंद साळवी,
पोलीस उपआयुक्त, वाहतूक