Join us  

कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची होणार नोंद; महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:41 AM

ओल्या कचºयावर प्रक्रिया करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये सूट अशा योजना राबविल्या जात आहेत.

मुंबई : ओल्या कचºयावर सोसायट्यांच्या आवारातच प्रक्रिया करणाºया करदात्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र, प्रत्यक्षात किती गृहनिर्माण सोसायट्या ओला व सुका कचरा वेगळा करतात, त्यावर प्रक्रिया करतात, याबाबतची अचूक नोंद नाही. त्यामुळे प्रत्येक सोसायटीमधून दररोज उचलला जाणारा कचरा, ओला व सुक्या कचºयाच्या वर्गीकरणाचे प्रमाण, कचºयावर केलेली प्रक्रिया याची नोंद ठेवण्यासाठी महापालिका प्रत्येक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्टिकर लावणार आहे. याचा पहिला प्रयोग मुलुंड विभागात होणार आहे.

मुंबईतून दररोज सात हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात येतो. कचºयाचे प्रमाण कमी होण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबविले, तसेच ओल्या व सुक्या कचºयाच्या वर्गीकरणावर भर देण्यात आला आहे. ओल्या कचºयावर प्रक्रिया करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये सूट अशा योजना राबविल्या जात आहेत. मात्र, कोणत्या सोसायटीमधून किती कचरा उचलला जातो? त्यात ओला व सुका कचरा किती? कचºयावर प्रक्रिया कुठे होते? याबाबत कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही. ही नोंद ठेवण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून पालिकेचे अधिकारी मुलुंड विभागातील प्रत्येक सोसायटीची पाहणी करणार आहेत.यासाठी झाली मुलुंडची निवड...मुलुंड विभागात केवळ दोन हजार सोसायट्या असून ५० छोट्या झोपडपट्ट्या आहेत. या विभागातून दररोज १३५ मेट्रिक टन कचरा उचलला जातो, तसेच कधी-कधी दररोजच्या कचºयाचे प्रमाण १६५ मेट्रिक टन असते. या विभागातील सोसायट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचारी -अधिकारी जाऊन माहिती घेणार आहेत.

मुंबईतून दररोज सात हजार मेट्रिक टन कचरा उचलला जातो. हा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग कचरा भूमीवर टाकण्यात येतो. ओला कचरा रोडवर माणसांसाठी यांच्यावरच प्रक्रिया करणाºया करदात्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्यात येते.के पश्चिम हा सर्वात मोठा विभाग असून यामध्ये अंधेरी लोखंडवाला, वर्सोवा आणि जुहू या भागांचा समावेश आहे. या भागातून दररोज ४०० मेट्रिक टन कचरा उचलला जातो.

टॅग्स :कचरा प्रश्नमुंबई महानगरपालिका