नोव्हेंबर महिन्यात ९७२१ मालमत्तांची नोंदणी; राज्य सरकारला मिळाला ७११ कोटी रुपयांचा महसूल

By मनोज गडनीस | Published: December 1, 2023 05:32 PM2023-12-01T17:32:08+5:302023-12-01T17:33:24+5:30

नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद आहे. 

registration of 9721 properties in the month of november in mumbai and state govt got a revenue of 711 crore | नोव्हेंबर महिन्यात ९७२१ मालमत्तांची नोंदणी; राज्य सरकारला मिळाला ७११ कोटी रुपयांचा महसूल

नोव्हेंबर महिन्यात ९७२१ मालमत्तांची नोंदणी; राज्य सरकारला मिळाला ७११ कोटी रुपयांचा महसूल

मनोज गडनीस, मुंबई - नोव्हेंबर महिन्यात मुंबईत ९७२१ मालमत्तांची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ८९६५ मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदाच्यावर्षी ही वाढ ११ टक्क्यांची आहे. या महिन्यात झालेल्या मालमत्तांच्या नोंदणीमुळे राज्य सरकारला ७११ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद आहे. 

ऑगस्ट ते ऑक्टोबर अशा तीन महिन्यांच्या काळात प्रत्येक महिन्यात मुंबईतील मालमत्तांच्या नोंदणीने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्या तुलनेत नुकत्याच सरलेल्या नोव्हेंबर महिनाखेरीस झालेली मालमत्तांची नोंदणी किंचितशी कमी आहे. मात्र, ऑक्टोबरच्या मध्यावर दसरा होता तसेच नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिवाळी होती. दसरा ते दिवाळी या एका महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईत १२ हजार ६०० मालमत्तांची नोंदणी झाली आहे. सणासुदीच्या काळात लोकांना अधिक मालमत्ता खरेदी केल्याचे दिसून आले आहे.

Web Title: registration of 9721 properties in the month of november in mumbai and state govt got a revenue of 711 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई