Join us

म्हाडाच्या घरांसाठी उद्यापासून नोंदणी, एकूण २०३० सदनिका, १३ सप्टेंबरला काढणार लाॅटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 06:57 IST

ऑनलाइन अर्जांची मुदत ४ सप्टेंबर, दुपारी ३ पर्यंत आहे. अनामत रकमेची ऑनलाइन स्वीकृती ४ सप्टेंबर रात्री ११:५९ पर्यंत केली जाईल. अर्जांची प्रारूप यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. ऑनलाइन दावे,  हरकतीसाठी ९ सप्टेंबर, दुपारी १२ पर्यंत मुदत आहे. अर्जाची अंतिम यादी ११ सप्टेंबरला सायं. ६ वाजता प्रसिद्ध होईल.

मुंबई : म्हाडाच्या गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स (मालाड) या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील दोन हजार ३० घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून सुरुवात होणार आहे. १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येईल. अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी १२ पासून उपलब्ध होईल. ऑनलाइन अर्जांची मुदत ४ सप्टेंबर, दुपारी ३ पर्यंत आहे. अनामत रकमेची ऑनलाइन स्वीकृती ४ सप्टेंबर रात्री ११:५९ पर्यंत केली जाईल. अर्जांची प्रारूप यादी ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध होईल. ऑनलाइन दावे,  हरकतीसाठी ९ सप्टेंबर, दुपारी १२ पर्यंत मुदत आहे. अर्जाची अंतिम यादी ११ सप्टेंबरला सायं. ६ वाजता प्रसिद्ध होईल.

घरे आली कोठून?म्हाडाने स्वत: बांधलेल्या १३२७ घरांबरोबरच कास नियंत्रण नियमावली ३३(५), ३३(७) आणि ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डरांकडून गृहसाठा म्हणून मिळालेली ३७० घरे आणि पूर्वीच्या लॉटरीतील विविध वसाहतींत विखुरल्या स्वरूपात असलेल्या ३३३ घरांचा समावेश या सोडतीत करण्यात आला आहे. 

सोडतीसाठी...     लॉटरीत सहभागी होण्याकरिता म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टीम मोबाइल ॲपची सुविधा.     https://housing. mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत जमा प्रक्रिया.    अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनिचित्रफिती आणि हेल्प फाईल संकेतस्थळावर.  

वार्षिक उत्पन्न मर्यादा गट    उत्पन्न मर्यादाअत्यल्प    ६ लाखअल्प    ९ लाखमध्यम    १२ लाखउच्च    १२ लाखांहून अधिक (या गटासाठी कमाल मर्यादा नाही.) 

सावधानम्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणाशीही व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :म्हाडाराज्य सरकार