Join us
Daily Top 2Weekly Top 5

नमो महारोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करा; मंगलप्रभात लोढा यांचे बेराेजगारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 10:37 IST

नोकरी इच्छुकांनी नमो महारोजगार मेळाव्यासाठी नाेंदणी करावी,  असे आवाहन आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. 

मुंबई :  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे २४, २५ फेब्रुवारी  रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नमो महारोजगार  मेळाव्याचे आयाेजन केले आहे. कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी नमो महारोजगार मेळाव्यासाठी नाेंदणी करावी,  असे आवाहन आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. 

 लोढा म्हणाले की, दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.   या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन केले असून इच्छुक युवक-युवतींनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपोमध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांना सहभागी होण्याची संधी आहे, असेही ते म्हणाले. 

नामांकित कंपन्या होणार सहभागी  :

या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वरती जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करुन मुलाखत देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.

वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी :

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढा