Join us

एसी लोकलचे तिकीट कमी करा; सर्वेक्षणात अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 02:29 IST

ठाणे ते पनवेल या मार्गावर धावणाºया एसी लोकलमध्ये सर्वेक्षण केले गेले. तीन तिकीट तपासकांकडून एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका दिली.

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली एसी लोकल सुरू केली. मात्र या एसी लोकलचे प्रवासी भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी पाठ दाखविली. परिणामी एसी लोकलला मागील दीड महिन्यापासून कमी प्रतिसाद मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच इतर प्रवाशांचे सर्वेक्षण केले. यामध्ये सर्व प्रवाशांनी भाडे कमी करण्याची मागणी करण्याचे प्रशासनाला सुचविले.

मध्य रेल्वेकडून पाच हजार प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये एसी लोकलबाबत प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे तिकीट कमी करण्याची मागणी केली. यासह एसी लोकलच्या फेºया वाढविण्यात येण्याची मागणी ९५ टक्के प्रवाशांनी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली.

ठाणे ते पनवेल या मार्गावर धावणाºया एसी लोकलमध्ये सर्वेक्षण केले गेले. तीन तिकीट तपासकांकडून एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका दिली. त्यात महिला आणि दिव्यांग प्रवाशांना एसी लोकलसाठी विशेष सुविधा देण्याची मागणी प्रवाशांनी केली. सर्वेक्षणात गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास करून रेल्वे प्रशासन काम करेल.

टॅग्स :एसी लोकल