जलतरण तलावाचा पुनर्विकास रखडला
By Admin | Updated: November 14, 2014 01:28 IST2014-11-14T01:28:18+5:302014-11-14T01:28:18+5:30
पश्चिम उपनगरातील कांदिवलीमधील महापालिकेचा सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव गेले दोन वर्ष रखडला आहे.

जलतरण तलावाचा पुनर्विकास रखडला
जयाज्योती पेडणोकर ल्ल कांदिवली
पश्चिम उपनगरातील कांदिवलीमधील महापालिकेचा सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलावाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव गेले दोन वर्ष रखडला आहे. उद्यान विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांच्या चालढकलपणा आणि दुर्लक्षामुळे जलतरण तलावाचा पुनर्विकास रखडल्याचे सूत्रंकडून बोलले जाते.
कांदिवली पश्चिम एम.जी.रोड येथे महापालिकेचा सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव आहे. या जलतरण तलावाचा पुनर्विकास पालिका ऑलिम्पिक दर्जाच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुनर्विकासासाठी 5 कोटी 95 लाखांचा फंड पालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे.
1968 साली बांधण्यात आलेल्या या जलतरण तलावाचे लोकार्पण 6 फेब्रुवारी 1972 साली माजी महापौर डॉ. हेमचंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले होते. 21 मार्च 2क्12 ला तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार इमारत धोकादायक असल्याचे सांगत तिचा पुर्नविकास करण्याचे आदेश दिले होते. तसेच 42 वर्षानंतर अतिरिक्त आयुक्त पूर्व नगरे, स्ट्रक्चरल इंजिनीयर यांनी अहवालानंतर 3क् जुलै 2क्13 ला जलतरण तलाव बंद करण्याची नोटीस दिली. मात्र, स्थानिकांनी जलतरण तलाव बंद करु नये, अशी मागणी करताच जोपर्यंत पुनर्विकासाचे काम सुरु होत नाही, तोर्पयत जलतरण तलाव सुरु ठेवण्याचे आदेश त्यावेळी असलेल्या परिमंडळ 7 च्या पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, गेली दोन वर्ष उद्यान विभागातील वरिष्ठांच्या दिरंगाई आणि चालढकलपणामुळे जलतरणतलावाच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाची फाईल धूळखात पडून आहे. त्यामुळेच जलतरण तलावाचा पुनर्विकास रखडल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली आहे. इमारत धोकादायक असल्यामुळे पालिकेने टेकू लावून आधार दिला आहे.
हा तलाव बंद करण्याची नोटीस जुलै 2क्14 मध्ये व्यवस्थापकाने लावली होती. त्यावेळी सदस्यांनी सरदार वल्लभभाई पटेल जलतरण बचाव समिती स्थापन केली. हा तलाव बंद करून त्याचे खाजगीकरण करीत राजकीय नेत्यांच्या घशात घालता जाणार अशी शंका सदस्यांना होती. त्यामुळे त्यांनी आठवडाभर निषेध कार्यक्र म राबविला होता.