किंग्ज सर्कल स्थानकाच्या पायऱ्यांना नवे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:32 IST2019-11-18T00:32:31+5:302019-11-18T00:32:34+5:30
‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ च्या झोनल रँकिंगच्या सर्वेक्षणानुसार उपनगरी असलेल्या स्थानक (एसजी) मध्ये किंग्ज सर्कल स्थानकाने आठव्या क्रमांकावर पटकाविला.

किंग्ज सर्कल स्थानकाच्या पायऱ्यांना नवे रूप
मुंबई : हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकाच्या पायऱ्यांना रविवारी नवे रुप देण्यात आले. सीएसएमटी दिशेकडील जिन्याच्या पायºया दुरवस्थेत होत्या. या पायºयावरील रंग उडालेला होता. येथील रेल्वे कर्मचाºयांनी एका खासगी कंपनीद्वारे येथील पायºयांना रंग दिला.
‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ च्या झोनल रँकिंगच्या सर्वेक्षणानुसार उपनगरी असलेल्या स्थानक (एसजी) मध्ये किंग्ज सर्कल स्थानकाने आठव्या क्रमांकावर पटकाविला. तर, किंग्ज सर्कल स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि महसूल या ‘एसी २’ विभागातून किंग्ज सर्कलने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
स्थानकांची स्वच्छता आणि साफसफाई करणे हे आपले काम आहे. सुरूवातीला किंग्ज सर्कल स्थानक हे भकास स्थानक म्हणून ओळखले जात होते. मात्र या स्थानकाच्या प्रत्येक ठिकाणाला स्वच्छ केले. त्यामुळे संपूर्ण स्थानक स्वच्छ झाले. स्थानकाच्या शेजारी छोटी बाग तयार केली आहे. मागील दोन रविवार दोन्ही जिन्यांच्या पायºयांना रंग देण्याचे काम करण्यात आले. त्यानुसार पायºयांना नवे रुप मिळाले आहे. स्थानकावरील प्रत्येक प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळते, अशी प्रतिक्रिया स्टेशन प्रबंधक एन. के. सिन्हा यांनी दिली.