Join us  

लालपरी डीजिटल! आता मोबाइलवर कळणार एसटीचे निश्चित ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 6:30 AM

३५ कोटींची तरतूद : एसटी बसेस येणार ‘जीपीएस’च्या नियंत्रणाखाली

चेतन ननावरे 

मुंबई : आॅनलाइन अ‍ॅग्रीगेटर्सप्रमाणे एसटी महामंडळातील बसेसही आता ‘जीपीएस’च्या नियंत्रणाखाली येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटी स्थानकांवर लावलेल्या डिजिटल बोर्डवर एसटीची निश्चित वेळ समजू शकेल. तर मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीच्या निश्चित ठिकाणाची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाने सुमारे ३५ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंग देओल यांनी ‘लोकमत’ला दिली.

रणजीत सिंग देओल यांनी सांगितले की, रस्त्यांसह विविध प्रकल्पांमुळे होणारी वाहतूककोंडी असो वा अपघात किंवा तत्सम अनेक कारणांमुळे कधीतरी एसटीला विलंब होतो. अशावेळी एसटीची निश्चित वेळ व ठिकाण प्रवाशांना कळणे गरजेचे असते. त्यादृष्टीने नाशिक विभागात पथदर्शी प्रकल्प म्हणून यंत्रणा राबवण्यात आली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्याने त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्याचे नियोजन आहे. मुंबई, ठाणे, पुणे अशा सहा विभागांतील एसटी बसेस जीपीएसच्या नियंत्रणाखाली येतील. त्यानंतर राज्यभरातील सर्व एसटी बसेस जीपीएसच्या कक्षेत येतील. यामुळे प्रवाशांना एसटीचे निश्चित ठिकाण समजेल. तर स्थानकांवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना एसटी सुटण्याची निश्चित वेळ समजू शकेल.रोड मॅपिंगचे काम सुरू असून एसटी बसेसच्या मार्गांची माहिती गोळा केली जात आहे. तरी पहिल्या टप्प्यात सहा विभागांतील एसटी बसेस जीपीएसच्या कक्षेत आणण्याचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता महामंडळाने व्यक्त केली. त्यानंतर येत्या सहा महिन्यांत राज्यभरात ही यंत्रणा कार्यान्वित होईल.जीपीएस यंत्रणेमुळे असे होणार फायदेच्या यंत्रणेत सर्व स्थानकांवर डिजिटल फलक लावले जातील. याद्वारे प्रवाशांना एसटीची वेळ पाहता येईल.च्जीपीएस यंत्रणेमुळे एसटी चालकाने एखादा स्टॉप चुकवला तर त्याचीही माहिती प्रशासनाला कळेल.च्मोबाइलवर ग्राहकांना एसटी बसचे निश्चित ठिकाण समजेल.च्स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना किती वेळात एसटी येणार, याची माहिती मिळेल.च्वाहन चालक किती वेगाने एसटी चालवित आहे, याचीही माहिती जीपीएसमुळे समजणार आहे.

टॅग्स :राज्य रस्ते विकास महामंडळबेस्ट