पालिकेच्या लेखामधील घोळाची फेरतपासणी
By Admin | Updated: December 25, 2014 01:22 IST2014-12-25T01:22:22+5:302014-12-25T01:22:22+5:30
सात वर्षांपासून मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या लेखा विभागातील घोळाची फेरतपासणी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंटमार्फत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला

पालिकेच्या लेखामधील घोळाची फेरतपासणी
मुंबई : सात वर्षांपासून मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या लेखा विभागातील घोळाची फेरतपासणी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंटमार्फत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ तसेच फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याचा लेखा अहवाल स्थायी समितीपुढे अखेर सादर होणार आहे़
२००७ मध्ये संगणकीकृत कारभार सुरू झाल्यापासून लेखा विभागाचे अहवालच सादर झाले नाहीत़ मात्र त्यानंतर लेखापरीक्षणामध्ये २००७ च्या लेखात घोळ असल्याचे उजेडात आले़ सुमारे दहा हजार कोटींचा हिशोब लागत नसल्याने याची चौकशी करण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी लावून धरली होती़ त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आज विशेष बैठक बोलाविण्यात आली होती़
पालिकेच्या नियमानुसार लेखा अहवाल प्रत्येक महिन्यात स्थायी समितीपुढे सादर होणे बंधनकारक आहे़ मात्र सात वर्षांचे अहवाल सादर न झाल्यामुळे या लेखांची आता इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंटमार्फत फेरतपासणी
करून घेण्याची मागणी देशपांडे यांनी केली़ ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे़ तसेच फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्याचा लेखा अहवालही छाननीसाठी समितीपुढे येणार
आहे़ (प्रतिनिधी)