रिक्षा चालकांकडून ७ लाखांची वसुली
By Admin | Updated: January 7, 2015 00:28 IST2015-01-07T00:28:25+5:302015-01-07T00:28:25+5:30
अनधिकृतणे रिक्षा चालविण्यासंदर्भातील तक्रारींवर दोषी रिक्षा चालकांकडून आरटीओने ७,२०,६५० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

रिक्षा चालकांकडून ७ लाखांची वसुली
पूनम गुरव ल्ल नवी मुंबई
प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणे, जवळचा मार्ग सोडून लांबचा मार्ग निवडणे, तसेच रिक्षाच्या मिटरमध्ये फेरफार करणे, अनधिकृतणे रिक्षा चालविण्यासंदर्भातील तक्रारींवर दोषी रिक्षा चालकांकडून आरटीओने ७,२०,६५० रूपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षभरात ४७९ रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणा-या २०० रिक्षांवर कारवाई करण्यात आली .
शहरात अनेक ठिकाणी प्रवाशांना रिक्षा चालकांच्या उध्दट वागण्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भांडणे होतात. त्याचबरोबर मीटरमध्ये फेरफार, भाडे नाकारणे, तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यासारख्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त होऊन आरटीओकडे तक्रारी करतात.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या कारवाईत जानेवारी ते डिसेंबर २०१४ पर्यंत आरटीओने १३६० वाहनांची तपासणी केली. त्यामधील ४७९ रिक्षा दोषी आढळल्या असून त्यातील ४५० रिक्षाचालकांवरील तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. ५७ रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे आकारले आहे, तर शेअर रिक्षाच्या नावाखाली जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या २०० रिक्षा चालकांवर आतापर्यंत कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)
३४० जणांचे परवाने निलंबित
च्३ रिक्षांवर जादा भाडे आकारणे, ५५ रिक्षांवर दूरचे भाडे नाकारणे, २८ रिक्षा चालकांवर प्रवाशांची उध्दट वर्तन करणे आणि रिक्षामध्ये फेरफार केल्याबाबत १४३ रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३४० रिक्षा चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. रिक्षाचालकांनी नियमाचे पालक करावे, तसेच प्रवाशांना होणारा त्रास कमी व्हावा, या हेतूने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाईची मोहीम राबवण्यात आली.
आरटीओकडून महिन्यातून तीन वेळा विविध ठिकाणी रिक्षा तपासल्या जातात. ज्या प्रवाशांना रिक्षाचालक त्रास देत आहेत, अशा सर्व रिक्षा चालकांनी आरटीओच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.
- संजय धायगुडे, अधिकारी,
उपप्रादेशिक परिवहन विभाग