विक्रम-मिनीडोअरचा संप

By Admin | Updated: September 19, 2014 23:03 IST2014-09-19T23:03:10+5:302014-09-19T23:03:10+5:30

रायगड जिल्ह्यातील विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मोर्चाचे आयोजन केले होते.

The record of Vikram-MiniDoire | विक्रम-मिनीडोअरचा संप

विक्रम-मिनीडोअरचा संप

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी मोर्चाचे आयोजन केले होते. याबाबत  संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल भगत यांनीजिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना निवेदन दिले. लवकरच न्याय न मिळाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मिनीडोअर रिक्षा हे प्रमुख वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे आजच्या मोर्चामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले.
मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतून जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कजर्त आणि खालापूर हे सहा तालुके वाहतुकीच्या नियमातून वगळण्यात यावेत, तसेच विक्रम-मिनीडोअर टॅक्सीची वयोमर्यादा 2क् वर्षे करावी, स्क्रॅप करण्यात येणा:या गाडय़ांच्याच परमिटवर नवीन वाहन वाढविण्यासाठी मान्यता देण्यात यावी, वाहतुकीसाठी 98क् सीसी इंजिनची अट शिथिल करावी. नव्याने एकही टॅक्सी परमिट देऊ नये, इलेक्ट्रीक मीटरच्या दंडाच्या रकमेत सूट द्यावी. अशा प्रमुख मागण्या असून त्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत.
विक्रम-मिनीडोअर चालक मालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सुमारे सात हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकार उपजीविकेचे साधन हिरावून घेत असून सरकारचा हा डाव आम्ही हाणून पाडू असे संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले. आम्ही सनदशीर मार्गाने लढा देत असून तो असाच सुरु राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या मागण्यांबाबत सरकारला कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी भांगे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
 

 

Web Title: The record of Vikram-MiniDoire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.