विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 06:12 IST2019-03-06T06:12:33+5:302019-03-06T06:12:41+5:30

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून पुन्हा एकदा अध्यक्षपदी दिलीप करंबेळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Reconstruction of Encyclopedia Creation Board | विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना

विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना

मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून पुन्हा एकदा अध्यक्षपदी दिलीप करंबेळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातून ३१ सदस्यांचा मंडळात समावेश असून काही सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. या मंडळाचा कालावधी तीन वर्षांचा असून याविषयीचा शासन निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला.
मराठी विश्वकोशाच्या विषयनिहाय अद्ययावतीकरणासाठी ज्ञानमंडळाचीही स्थापना केली आहे. राज्यभरातील ज्ञानमंडळांनी १,५०० हून अधिक नोंदी अद्ययावत केल्या. या ज्ञानमंडळांना नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आहे. यातील साहाय्यकांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Reconstruction of Encyclopedia Creation Board