बाप्पांच्या आगमनाची चाहूल
By Admin | Updated: August 25, 2014 02:05 IST2014-08-22T23:32:25+5:302014-08-25T02:05:42+5:30
बाप्पांच्या आगमनाची चाहूल

बाप्पांच्या आगमनाची चाहूल
बाप्पांच्या आगमनाची चाहूल
मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. बाप्पाच्या आगमनाची तयारी आता सार्वजनिक मंडळांसह घराघरांमध्येही सुरु झाली आहे. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची मखर दाखल झाल्या आहेत. लहान मुलांसह त्यांचे पालक बाजारपेठांमध्ये मखरांसह, बाप्पांचे दागीने, हार, शोभेच्या अन्य वस्तू घेण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. सजावटीसाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. बाप्पांची चाहूल लागल्याने बाजारपेठांमधील हे चैतन्य वाढतच चालले आहे. श्री गणेशाच्या आगमनासाठी सज्ज होत असताना शेवटचा विकेन्ड हाती असल्याने गणेशभक्तांच्या गर्दीने बाजारपेठा खुलून गेल्या आहेत. (प्रतिनिधी)