सायन येथे बनावट नोटा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:32 IST2020-03-04T23:31:58+5:302020-03-04T23:32:05+5:30
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्षा ४ ने मंगळवारी सव्वापाचच्या सुमारास सायन सर्कल येथून बनावट नोटा हस्तगत केल्या.

सायन येथे बनावट नोटा हस्तगत
मुंबई : गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्षा ४ ने मंगळवारी सव्वापाचच्या सुमारास सायन सर्कल येथून बनावट नोटा हस्तगत केल्या. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचत पोलिसांनी भास्कर नाडर (४३) या व्यक्तीला नोटांसह ताब्यात घेतले. भास्करकडे २०००, ५०० व २०० च्या एक लाख २८ हजार ६०० रुपये किमतीच्या एकूण १५१ नोटा सापडल्या. हस्तगत करण्यात आलेल्या नोटांचे बारकाईने निरीक्षण केले असता यातील बहुतेक नोटांचा सीरियल क्रमांक सारखाच होता. भास्कर हा तामिळनाडूमधील वेल्लूरचा रहिवासी असून त्याच्यावर मुंबईत विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.